मराठी मनोरंजन सृष्टीतील एव्हरग्रीन जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर. गेली अनेक वर्ष ते आपल्या कामाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. ८०-९० च्या दशकांत सचिन व सुप्रिया यांनी एकत्र मिळून अनेक चित्रपट केले. या दोघांवर चित्रित झालेली अनेक गाणीही खूप गाजली. पण गेल्या काही वर्षांत सचिन व सुप्रिया पिळगावकर एकत्र डान्स करताना दिसले नव्हते. आता अखेर ही प्रतीक्षा संपली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या सर्वत्र ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याची चर्चा आहे. यंदाचा हा पुरस्कार सोहळा खूप खास असणार आहे. याचं कारण म्हणजे अनेक वर्षांनी सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर एकत्र डान्स करताना दिसणार आहेत. त्यांच्याच सुपरहिट झालेल्या गाण्यांवर ती दोघं नृत्य सादर करताना दिसतील.

आणखी वाचा : Video: …अन् श्रीवल्ली मराठीत बोलू लागली, रश्मिका मंदानाचा मराठमोळा अंदाज चर्चेत

या पुरस्कार सोहळ्याचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर त्यांच्या डान्सची रिहर्सल करताना दिसत आहेत. १९८४ साली प्रदर्शित झालेल्या ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या सुपरहिट चित्रपटातील ‘ही नवरी असली’ या गाण्यावर ती दोघं अनेक वर्षांनी एकत्र डान्स करणार आहेत, असं या व्हायरल झालेल्या प्रोमोमधून स्पष्ट होत आहे.

हेही वाचा : “त्या काळी आमच्यात स्पर्धा होती पण…,” सचिन पिळगांवकरांनी उलगडलं महेश कोठारेंबरोबरचं नातं

आता या पोस्टवर कमेंट करत अनेक वर्षांनी या दोघांचा एकत्र डान्स परफॉर्मन्स पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं नेटकरी सांगत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin pilgaonkar and supriya pilgaonkar will be dancing together at zee gaurav awards rnv