Sairaj Kendre And Vedanti Bhosale Dance : ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्यावर केलेला डान्स आणि गोड हावभावाने साईराज केंद्रेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. साईराजच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. सध्या साईराज ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेतून आपल्या सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेत त्याने साकारलेला सिंबा म्हणजेच अमोल कदम प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. अशातच साईराजने ‘ड्रामा ज्युनियर्स’ फेम वेदांती भोसलेबरोबर केलेल्या जबरदस्त डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर सतत वेगवेगळी गाणी ट्रेंड होत असतात. या ट्रेंडिंग गाण्यावर साईराज नेहमी भन्नाट डान्स करताना दिसतो. सध्या संजू राठोडचं ‘काळी बिंदी’ हे गाणं खूप ट्रेंड होत आहे. या गाण्यात एका गावातील जोडप्याची काल्पनिक कथा मांडली आहे. यामध्ये आकृति नेगी आणि स्वतः संजू पाहायला मिळत आहे. संजूच्या या सुपरहिट गाण्याची भुरळ साईराज केंद्रे आणि वेदांती भोसलेला पडली आहे. दोघांनी देखील खूप सुंदर डान्स केला आहे.

हेही वाचा – Video: तेजश्री प्रधानला बनवता येत नाही ‘हा’ पदार्थ, इम्प्रेस करण्यासाठी करावी लागेल ‘ही’ गोष्ट

व्हिडीओमध्ये, साईराज पांढरा शर्ट आणि काळ्या रंगाच्या पँटमध्ये दिसत आहे. तर वेदांतीने काळ्या रंगाचा सुंदर फ्रॉक, केसात गजरा आणि कपाळावर काळी टिकली लावली आहे. दोघं ‘काळी बिंदी’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळत आहे. दोघांच्या या डान्स व्हिडीओला अवघ्या काही तासांत लाखोहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: चाहत पांडेने सलमान खानला घातली लग्नाची मागणी, भाईजान म्हणाला, “तुझ्या आईचं आणि…”

हेही वाचा – रिद्धिमा कपूरचा पती आहे तरी कोण? २५२ कोटींची कंपनी सांभाळणाऱ्या रणबीरच्या मेहुण्याबद्दल जाणून घ्या…

“खूप भारी”, “भाई तू लवकरच मोठा स्टार होणार आहेस”, “किती गोड”, “छान”, “वेदांती खूप गोड दिसतेय”, “दोन गोड मुलं एका फ्रेममध्ये भारी”, “साईराज आणि वेदांती वाव”, अशा अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sairaj kendre dance with vedanti bhosale on kaali bindi song pps