Tejashri Pradhan : मराठी मालिकाविश्वात आपल्या सहजसुंदर अभिनयाने अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाच्या गोष्ट’ मालिकेतून तेजश्री प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत तिने साकारलेली मुक्ता आता घरोघरी पोहोचली आहे. ही मुक्ता प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. अशातच तेजश्रीचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.

नुकताच ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाचा ‘स्टार प्रवाह’वर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर पार पडला. या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरसाठी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील नायिकांचे काही खास व्हिडीओ करण्यात आले होते. ज्यामध्ये त्यांना काही प्रश्न विचारले होते. असाच एक व्हिडीओ तेजश्री प्रधानचा चर्चेत आला आहे. ज्यामध्ये तेजश्री तिला बनवता न येणाऱ्या पदार्थापासून बाईचा सर्वात मोठ्या शत्रूबद्दल सांगताना दिसत आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: चाहत पांडेने सलमान खानला घातली लग्नाची मागणी, भाईजान म्हणाला, “तुझ्या आईचं आणि…”

या व्हिडीओमध्ये सर्वात आधी तेजश्री प्रधानला विचारलं जात की, तुम्हाला कोणता पदार्थ बनवता येत नाही? तेव्हा तेजश्री म्हणते, “चपाती.” त्यानंतर विचारलं की, बाईचा सर्वात मोठा शत्रू? त्यावर तेजश्री म्हणाली, “माहित नाही.” पुढे अभिनेत्री विचारलं, “पर्समध्ये कायम असणाऱ्या तीन गोष्टी?” तेजश्री म्हणाली, “चार्जर, स्पीकर, फर्स्ट ऐड बॉक्स”

चौथा प्रश्न विचारला, “सकाळी उठलात आणि पुरुष म्हणून जागे झालात तर काय करालं?” माहिती नाही, असं उत्तर तेजश्रीने दिलं. त्यानंतर “मुली कशाने इम्प्रेस होतात?”, असं विचारलं असता तेजश्री म्हणाली, “बुद्धिमत्ता.” मग “तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी काय केलं पाहिजे?” असं विचारलं. तेव्हा अभिनेत्री म्हणाली की, खूप शिस्तबद्ध आयुष्य जगावं लागेल. त्यानंतर पुरुषांनी तुम्हाला कोणकोणत्या घर कामामध्ये मदत केली पाहिजे? या प्रश्नाचं उत्तर देत तेजश्री म्हणाली की, आताच्या काळात मला असं काही वाटतं नाही. पुरुष मदत करतात. सर्व काही समान असतं.

हेही वाचा – रिद्धिमा कपूरचा पती आहे तरी कोण? २५२ कोटींची कंपनी सांभाळणाऱ्या रणबीरच्या मेहुण्याबद्दल जाणून घ्या…

हेही वाचा – Bigg Boss 18: अडीच कोटींच्या फ्लॅटच्या बदल्यात मुलाला भेटण्याची परवानगी अन्…; हेमा शर्मावर पूर्वाश्रमीच्या पतीने केले गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तेजश्री प्रधानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं घर निर्माण केलं आहे. तिची कुठलीही मालिका, नाटक, चित्रपट असो प्रेक्षक वर्ग त्यावर भरभरून प्रेम करतो. मालिकाविश्वातील लाडकी सून असं तिला म्हटलं जात. अशा या लोकप्रिय अभिनेत्रीने गेल्यावर्षी तब्बल अडीच वर्षांनी मालिकाविश्वात जोरदार पुनरागमन केलं.