‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘हे मन बावरे’, ‘होणार सून मी या घरची’, ‘रंग माझा वेगळा’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’, ‘पाहिले न मी तुला’, अशा अनेक मालिकांतून नायक-खलनायक अशा भूमिका साकारणाऱ्या लोकप्रिय अभिनेता म्हणजे शशांक केतकर होय. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवर मुरांबा या मालिकेत अक्षयची भूमिका साकारताना दिसत आहे. आता मात्र अभिनेत्याने त्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त केलेली पोस्ट सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाला अभिनेता?

शशांक केतकरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याच्या पत्नीबरोबरचे अनेक फोटो पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये ते दोघेही खूप आनंदात दिसत आहेत. त्यांच्या लग्नाचेदेखील काही फोटो यामध्ये पाहायला मिळत आहेत. ही पोस्ट शेअर करताना शशांकने लिहिले, “फक्त सात वर्षं झाली. बाकी सगळं जग एका बाजूला आणि तुझ्यावरचं प्रेम, तू एका बाजूला”, हे लिहिताना हार्ट इमोजीदेखील शेअर केल्या आहेत.

इन्स्टाग्राम

अभिनेत्याच्या या पोस्टवर चाहत्यांसह काही कलाकारांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर, शर्मिष्ठा राऊत या अभिनेत्रींनी ‘हॅपी अ‍ॅनिव्हर्सरी’ असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. तर एका चाहत्याने शशांक व त्याच्या पत्नीला शुभेच्छा देताना म्हटले, “जशी बागेत दिसतात फुलं छान, तशीच दिसते तुमची जोडी छान. प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास, युनिक व सुंदर; पण तुमची लव्ह स्टोरी आहे माझी फेव्हरेट. लग्न म्हणजे पती-पत्नी या दोघांच्या आयुष्यातील महत्त्वाचा व आनंदाचा क्षण. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “हॅपी वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी. तुम्ही दोघेही क्यूट आहात. असेच खूश राहा.”

शशांक व प्रियाकांने ४ डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला सात वर्ष आज पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने शशांकने केलेली ही पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा: पुन्हा कर्तव्य आहे: आकाश आणि वसुंधराचं नातं मोडलं! प्रोमो पाहून प्रेक्षकांनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले…

दरम्यान, अभिनेता सध्या ‘मुरांबा’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळताना दिसते. सध्या मालिकेत रमा-अक्षयने रेवाचे सत्य सर्वांसमोर आणले असून, अनेक संकटांवर मात करीत ते एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. आता या मालिकेत पुढे काय होणार, याविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shashank ketkar shares special post for wife on seventh wedding anniversary nsp