Shilpa Shirodkar Talks About Loneliness : शिल्पा शिरोडकरने ९०च्या काळात अनेक चित्रपटात काम केलं. अलीकडे ती चर्चेत आली ते ‘बिग बॉस’मधील तिच्या सहभागामुळे. शिल्पा मधल्या काही काळात तिच्या पतीसह परदेशात राहात होती. अशातच आता तिने परदेशातील आठवणी सांगितल्या आहेत.

शिल्पाने नुकतीच ‘डेलनाज इराणी’ला मुलाखत दिली. यामध्ये तिने याबद्दल सांगितलं आहे. शिल्पा म्हणाली, “मला लोकांमध्ये राहायला आवडतं आणि जे करिअर मी निवडलेले त्यामुळे मी नवनवीन लोकांना भेटायचे. मी खूप व्यग्र असायचे. त्यामुळे परदेशात राहताना मला खूप एकटेपणा जाणवायचं.”

परदेशात जाणवायचा एकटेपणा – शिल्पा शिरोडकर

शिल्पा पुढे म्हणाली, “आम्ही कधीच एका देशात नाही राहिलो. आम्ही खूप प्रवास केला त्यामुळे माझ्यासाठी हे खूप कठीण होतं. एकटेपण मला खात होतं. माझा नवरा त्याच्या कामामुळे खूप प्रवास करतो. माझी मुलगी शिक्षणासाठी परदेशात गेली आहे. त्यामुळे मी घरी एकटीच असते. मी तरुण असताना याबद्दल काही वाटायचं नाही. पण आता मला आजूबाजूला माणसं हवी असतात. मला ते वातावरन खूप आवडतं.”

शिल्पाने पुढे अभिनय क्षेत्रात परतण्याबद्दल सांगितलं आहे. भारतात परतत असताना तिच्याकडे कुठलंही काम नव्हतं. ती म्हणाली, “मी काम मिळवण्यासाठी कास्टिंग एजेंटला फोन करायचे आणि ते प्रतिसादही द्ययाचे. त्यांना माहित आहे मी कामाच्या शोधात आहे.”

शिल्पाने त्यावेळी तिला आलेला एक अनुभव सांगितला आहे. कास्टिंग एजेंटबद्दल बोलताना ती म्हणाली, एका गाजलेल्या वेब शोच्या दुसऱ्या पर्वासाठी तिला विचारणा झालेली पण त्यातील काही सीनमुळे तिने नकार दिला. जेव्हा तीने ती भूमिका करण्यास नकार दिला तेव्हा तिला त्या एजेंटने तिच्याकडे शिल्पासाठी अजून एक रोल असल्याचं सांगितलं. परंतु, पुढे काही झालं नाही.

शिल्पा शिरोडकर गेल्या वर्षी ‘बिग बॉस’ च्या १८व्या सीझनमध्ये झळकलेली. त्यावेळी ‘बिग बॉस’मुळे अभिनेत्री बरीच चर्चेत होती. आता काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या दाक्षिणात्य चित्रपटासंदर्भात पोस्ट शेअर केली होती. याव्यतिरिक्त ती कोणत्या नवीन भूमिकेत प्रेक्षकासमोर येणार हे पाहणं रंजक ठरेल.