‘धुमधडाका’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘फेकाफेकी’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘नवरा माझा नवसाचा २’ अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारे आणि खळखळून हसवणारे अभिनेते म्हणजे अशोक सराफ होय. आता ते कलर्स मराठी वाहिनीवर अशोक मा.मा. या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्या निमित्ताने बिग बॉस मराठी ५ चा विजेता व लोकप्रिय एन्फ्लुएन्सर सूरज चव्हाणने अशोक सराफ यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूरज चव्हाणने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अशोक सराफ यांना त्यांच्या नवीन मालिकेसाठी शुभेच्छा देताना म्हणतो, “नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा लाडका तुमचा सूरजभाऊ. आता आपल्या अशोक मामांची कलर्स मराठी चॅनेलवर मालिका येत आहे. तर तिला भरभरून प्रेम द्या. झापूक झुपूक पॅटर्नमध्ये त्यांच्यावर प्रेम करा आणि ती मालिका नक्की पाहा. मामा असल्यावर कल्ला तर होणारच आणि गुलिगत गाजणार”, असे म्हणत सूरजने चाहत्यांना मालिका बघण्याचे आवाहन केले आहे.

इन्स्टाग्राम

हा व्हिडीओ शेअर करताना, “अशोक मामांना माझ्याकडून गोलीगत शुभेच्छा! मालिकेवर झापूक-झुपूक पॅटर्नमध्ये प्रेम करा..!!!”, अशी कॅप्शन दिली आहे.

‘अशोक मा. मा.’ ही मालिका २५ नोव्हेंबरपासून कलर्स मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. कलर्स मराठी वाहिनीने या मालिकेची घोषणा केल्यापासून प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता वाढलेली दिसत आहे. बऱ्याच काळानंतर दिग्गज अभिनेते अशोक सराफ मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्याबरोबरच अभिनेत्री रसिका वाखारकर या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. ती ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली होती. या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

हेही वाचा: अर्जुन कपूरने ‘या’ व्यक्तीसाठी खांद्यावर काढला टॅटू, फोटो शेअर करत म्हणाला, “ती माझ्यावर…”

दरम्यान, अशोक सराफ ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटातून नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्याचे पाहायला मिळाले. त्याबरोबरच सूरज चव्हाण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अंकिता वालावलकरचे फोटो डिलीट झाल्यानंतर तो मोठ्या चर्चेत आला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suraj chavan greeting ashok saraf for his marathi serial ashok ma ma in unique way guligat wishes shares video nsp