Tharala Tar Mag Serial Title Song : जुई गडकरीची प्रमुख भूमिका असलेली ‘ठरलं तर मग’ मालिका ५ डिसेंबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली. जवळपास गेली अडीच वर्षे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका कायम पहिल्या स्थानी असते.
या मालिकेतील कलाकार, मालिकेचं कथानक, ट्विस्ट, कोर्टरुम ड्रामा या सगळ्या गोष्टींना प्रेक्षकांची पसंती मिळते. याशिवाय ‘ठरलं तर मग’ मालिकेचं शीर्षक गीतही प्रेक्षकांना फार आवडतं. मालिकेत अनेकदा सायली-अर्जुनच्या रोमँटिक सीनला किंवा कोणत्याही पॉझिटिव्ह सीनदरम्यान बॅकग्राऊंडला हे शीर्षक गीत ऐकायला मिळतं.
मालिकेची नायिका सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीने ‘वर्ल्ड म्युझिक डे’चं औचित्य साधून नुकतंच या मालिकेचं शीर्षक गीत गायलं. जुईला गायनाची प्रचंड आवड आहे, त्यामुळे तिचे चाहते गेले काही दिवस “तुम्ही मालिकेचं शीर्षक गीत गा…” अशी विनंती जुईला करत होते. अखेर ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सगळ्या चाहत्यांसाठी जुईने मालिकेचं शीर्षक गायलं आहे.
जुईने या शीर्षक गीतामधलं तिच्या आवडीचं दुसरं कडवं चाहत्यांसाठी गायलं आहे. जुई म्हणते, “माझं आवडतं शीर्षक गीत…माझा लाडका अंतरा…माझी लाडकी लेखिका रोहिणी, माझा लाडका गायक हृषिकेश रानडे दादा, माझी लाडकी गायिका प्रियांका बर्वे, माझी लाडकी मालिका ‘ठरलं तर मग’, माझ्या आवडीची वाहिनी ‘स्टार प्रवाह’…आणि माझी लाडकी सायली”
जुई गडकरीने गायलं ‘ठरलं तर मग’ मालिकेचं शीर्षक गीत
वाटेत भेटे ..
फुलांचा .. ऋतू
चांदणे .. उधळी..त
येताच तू …अंधार उजळे ..
तुझ्या पाऊली
नवा अर्थ जगण्यास
देतोस तू ..तुझ्या विना ना …
सुचेल काही ..
मलाच मा..झ्यात
दिसशील तू .. मगपहिल्या भेटीत
जे ना बोललो ..
ते बोलायचे ….ठरलं… तर मग!
ठरलं… तर मग!
ठरलं… तर मग!
दरम्यान, जुईने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “वाह सायली काय गायलीस”, “खूप खूप गोड आवाज आहे तुझा सायली”, “सायली किती गोड आवाज आहे”, “हे शीर्षक गीत तुमच्या आवाजात ऐकायचं आहे”, “मस्तच सायली” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.