Tharala Tar Mag New Episode : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या प्रतिमा सुभेदारांच्या घरी परत आल्याचा सीक्वेन्स चालू आहे. प्रतिमा घरी तर आली परंतु, तिची स्मृती गेलेली असते. तिला आधीचं काहीच आठवत नसतं. सुभेदारांच्या घरातील एकाही व्यक्तीला प्रतिमाने अद्याप ओळखलेलं नाही. तिच्या परत येण्याने रविराज, पूर्णा आजी यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सायली अगदी मनापासून प्रतिमाची काळजी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकीकडे प्रतिमा परतल्याने घरातील सर्व कुटुंबीय आनंदी झाले असताना दुसरीकडे प्रिया, नागराज, महिपत आणि साक्षी यांचा मोठा डाव फसला आहे. प्रतिमा जिवंत असल्याचं समजताच नागराज रागात महिपतच्या घरी जाऊन त्याला प्रतिमा जिवंत असल्याची माहिती देतो. “एवढ्या वर्षांनी घरी आलेली प्रतिमा स्मृतीभ्रंश झाल्याने गप्प आहे नाहीतर आपलं भांडं तिने कधीच फोडलं असतं” असं नागरात महिपतला सांगतो.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “मॅनर्स कळतात का?” निक्कीची वागणूक पाहून पुष्कर जोग संतापला; म्हणाला, “वर्षा मॅमला अशा पद्धतीने…”

रविराज प्रतिमाला किल्लेदारांच्या घरी नेण्यासाठी आग्रह धरतो. पण, सायली म्हणते, “त्यांना वेळ द्या, सध्या प्रतिमा आत्या फारसं कोणाला ओळखत नाहीत” असं सांगत “मी प्रतिमा आत्यांची सगळी काळजी घेईन” असं वचन सायली रविराजला देते. सायलीच्या मनाचा मोठेपणा पाहून सगळेच तिचं कौतुक करतात. सायलीचा चांगुलपणा पाहून रविराज सुद्धा प्रतिमाला सुभेदारांकडे ठेवण्याची परवानगी देतात. त्यामुळे आता प्रिया एक नवीन डाव खेळणार आहे.

हेही वाचा : २१ वर्षांचा संसार मोडला, आता मॉडेलला डेट करतोय बॉलीवूड अभिनेता, दोन मुलांचा बाबा झाल्यावरही केलं नाही लग्न, कारण सांगत म्हणाला…

प्रियाचं नवीन नाटक ( Tharala Tar Mag )

प्रिया सुरुवातीपासून पैशांच्या मोहापायी सुभेदारांची सून व्हायचं असतं. त्यामुळे अर्जुनशी लग्न करून सगळी संपत्ती घ्यायची असा तिचा डाव असतो. तर, अर्जुनला प्रियाशी गोड वागून मधुभाऊंच्या केसमधून मार्ग काढायचा असतो. प्रिया थेट अर्जुन-सायलीच्या बेडरुममध्ये जाते आणि अर्जुनच्या मांडीवर डोकं ठेवून प्रतिमाच्या परत येण्याने तिला कसा आनंदा झालाय असं भासवून भावुक होण्याचं नाटक करू लागते. प्रियाचा सर्व ड्रामा अर्जुन जाणून असतो. आता जर सायली रुममध्ये आली तर मोठी कोंडी होईल आणि ती भडकेल याची जाणीव अर्जुनला असते. दरवाजातून हळूच तो सायलीला खोलीच्या दिशेने पायऱ्या चढून येत असल्याचं पाहतो.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस’च्या घरात मोठा राडा! पहिल्याच आठवड्यात ‘हे’ सदस्य झाले नॉमिनेट, पाहा प्रोमो

Tharala tar mag मालिका

आता अर्जुनच्या खोलीत प्रियाला पाहून सायलीची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. सायली-अर्जुन एकमेकांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज जोडीदार असले तरीही दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल प्रेम असतं. त्यामुळे आता मिस्टर सुभेदारांची यामध्ये चांगलीच कोंडी झालीये असं ( Tharala Tar Mag )मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharala tar mag new episode priya new drama and arjun in the state of dilemma sva 00