Bigg Boss Marathi Season 5 Nomination : 'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्या दिवसापासून स्पर्धकांमध्ये वादाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं. वर्षा उसगांवकर - निक्की, निक्की-अंकिता यानंतर आता नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये आर्या आणि घरातील इतर स्पर्धकांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. घरातील सदस्य एकमेकांची काळजी घेण्याबरोबर काही स्पर्धकांमध्ये जोरदार भांडण झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे. आता घरात 'नॉमिनेशनची तोफ' हे पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. पहिल्याच टास्क दरम्यान घरातील सदस्यांमध्ये मोठं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे. निक्की तांबोळी आणि आर्या जाधव यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होणार आहे. तसेच आर्याने अरबाजला आणि वैभव चव्हाणलादेखील फटकारलं आहे. हेही वाचा : Bigg Boss Marathi : “अत्यंत लज्जास्पद…”, निक्कीने वर्षा उसगांवकरांचा अपमान केल्यामुळे मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, “रितेश देशमुख…” 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये निक्की तांबोळी आणि आर्या जाधव एकमेकांबरोबर मोठमोठ्याने भांडताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये आर्याला निक्कीचा चांगलाच राग आलेला दिसून येत आहे. आर्या निक्कीला "तुला घाबरायला पाहिजे", म्हणत धमकी देताना दिसत आहे. तर निक्की तिला "फट्टू" म्हणते. त्यावर आर्या तिला "वेडी" म्हणते. आर्या पुढे म्हणते,"मला शांत करायचं नाही"… आर्या आणि निक्कीचा राग अनावर झाल्याने घरातील इतर स्पर्धकांनी दोघींनाही शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नॉमिनेशन टास्क दरम्यान आणखी रंगत येणार आहे. हेही वाचा : Bigg Boss Marathi : वर्षा अन् निक्कीच्या वादावर मराठी अभिनेत्याची मोजक्या शब्दांत टिप्पणी, पोस्ट शेअर करत म्हणाला… Bigg Boss Marathi : घरातील सदस्यांमध्ये जोरदार भांडण ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी ) हेही वाचा : लक्ष्मीकांत बेर्डेंच्या एव्हरग्रीन गाण्यावर लहानग्या साईराज केंद्रेचा जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “ज्युनिअर लक्ष्या…” Bigg Boss Marathi च्या घरात 'हे' सदस्य झालेत नॉमिनेट 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या सदस्यांची नावं आता समोर आली आहे. यात वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, अंकिता प्रभू-वालावलकर, सूरज चव्हाण आणि कोल्हापूरच्या पुरुषोत्तमदादा पाटील या सदस्यांचा समावेश आहे. आता या सदस्यांमधून कोण 'बिग बॉस मराठी'च्या घराचा निरोप घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.