छोट्या पडद्यावरील मालिका घराघरांत पाहिल्या जातात. एकीकडे जरी ओटीटी माध्यमांना भरभरून पसंती मिळत असली तरीही टेलिव्हिजनचा चाहतावर्ग आजही मोठ्या प्रमाणात आहे. संध्याकाळ झाली की, घराघरांत या मालिका पाहिल्या जातात. यामुळेच वाहिन्यांमध्ये टीआरपीसाठी नेहमीच चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळतं. गेल्या अनेक महिन्यांपासून या शर्यतीत जुई गडकरीची ‘ठरलं तर मग’ मालिका बाजी मारत आहे. आता नुकत्याच आलेल्या टीआरपी आकडेवारीनुसार कोणती मालिका कोणत्या स्थानावर आहे जाणून घेऊयात…

मराठी टीआरपी तडका या इन्स्टाग्राम पेजवर दर आठवड्याला मालिकांचा टीआरपी शेअर केला जातो. या यादीनुसार पहिल्या १५ मध्ये स्टार प्रवाहच्या मालिकांना स्थान मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. ‘ठरलं तर मग’ मालिका या यादीत अव्वल स्थानी आहे. गेल्या दीड वर्षांपासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. यानंतर अनुक्रमे ‘लक्ष्मीच्या पावलांनी’, ‘तुझेच मी गीत गात आहे’, ‘प्रेमाची गोष्ट’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांना स्थान मिळालं आहे.

हेही वाचा : “एकजूट नाही, लॉबिंग करतात”, पुष्कर जोगने मराठी इंडस्ट्रीबद्दल मांडलं स्पष्ट मत; म्हणाला, “कोणाचीही साथ नाही…”

टीआरपीच्या शर्यतीत गेल्या काही वर्षांपासून स्टार प्रवाह वाहिनी आघाडीवर आहे. याशिवाय ‘झी मराठी’वर नव्याने सुरू झालेल्या काही मालिकांना टॉप २० मालिकांच्या यादीत स्थान मिळालं आहे. गेल्या आठवड्यात (११ मे ते १७ मे) कोणत्या मालिका कुठल्या स्थानवर आहे जाणून घेऊयात…

हेही वाचा : “जनावरांसारखं वागवलं जातं”, ‘पंचायत’ फेम अभिनेत्रीने मांडली इंडस्ट्रीतील व्यथा; म्हणाली, “कलाकारांना छोट्याशा घाणेरड्या खोलीत…”

टॉप २० मालिकांची यादी

१. ठरलं तर मग
२. लक्ष्मीच्या पावलांनी
३. तुझेच मी गीत गात आहे
४. प्रेमाची गोष्ट
५. घरोघरी मातीच्या चुली
६. सुख म्हणजे नक्की काय असतं
७. साधी माणसं
८. लक्ष्मीच्या पावलांनी महाएपिसोड
९. अबोली
१०. साधी माणसं – महाएपिसोड
११. मन धागा धागा जोडते नवा
१२. शुभविवाह
१३. मुरांबा
१४. लग्नाची बेडी
१५. आई कुठे काय करते
१६. मी होणार सुपरस्टार – जोडी नंबर १
१७. पारू – झी मराठी
१८. तुला शिकवीन चांगलाच धडा – झी मराठी
१९. पिंकीचा विजय असो
२०. शिवा

हेही वाचा : “अचकट विचकट कमेंट्स वाचण्यापेक्षा…”, वयावरून ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकर यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या…

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये जुई गडकरी, अमित भानुशाली, प्रियांका तेंडोलकर, मोनिका दबडे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.