Titeeksha Tawde Video : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांचा विवाहसोहळा यावर्षी २६ फेब्रुवारी रोजी पार पडला. या दोघांच्या लग्नाला सिनेविश्वातील असंख्य कलाकारांनी हजेरी लावली होती. या जोडप्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

लग्नसोहळा पार पडल्यावर सिद्धार्थ बोडकेने त्याच्या आणि तितीक्षाच्या संगीत सोहळ्याचा व्हिडीओ शेअर करत “When नाशिक कावडी meets कोकणी बँजो” असं कॅप्शन दिलं होतं. यावरून सिद्धार्थ हा मूळचा नाशिकचा तर, तितीक्षा ही कोकणातील असल्याचं स्पष्ट झालं होतं. अभिनेत्याचं नाशिकमध्ये सुंदर आणि मोठं घर आहे. तर, तितिक्षाचं बालपण डोंबिवलीत गेलं आहे. असं जरी असलं, तरीही अभिनेत्रीचं मूळ गाव कोकणात आहे. त्यामुळे सणाचं औचित्य साधत तितीक्षा आपल्या नवऱ्यासह कोकणात पोहोचली आहे.

हेही वाचा : Video : जान्हवीला मित्रांकडून मिळाला धोका! निक्की ठरली कारण; वैभव-अरबाजला थेट म्हणाली, “यापुढे मी तुमच्या…”

गौरी- गणपतीच्या सणाला मुंबईचे चाकरमानी कोकणाची वाट धरतात. सामान्य लोकांप्रमाणे सेलिब्रिटी सुद्धा शूटिंगमधून वेळ काढत सणासुदीला आपल्या घरी किंवा मूळ गावी जात असतात. आता तितीक्षा सुद्धा आपल्या नवऱ्याबरोबर कोकणात माहेरी गेली आहे. यावेळी अभिनेत्रीने सिद्धार्थला भातशेती, कोकणातलं जुनं घर, आजूबाजूच्या निसर्गरम्य परिसराची झलक दाखवली.

तितीक्षा आणि सिद्धार्थ ( Titeeksha Tawde )

हेही वाचा : अखेर दोन रांगडे गडी एकमेकांना भिडणार! संग्राम-अरबाजमध्ये कोण मारणार बाजी? कॅप्टन्सी टास्कचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले…

तितीक्षाने नवऱ्याला दाखवलं सुंदर कोकण

बायको ( Titeeksha Tawde ) कोकण दाखवतानाचा अभिनेता सिद्धार्थ बोडकेने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अभिनेत्याने या व्हिडीओला वैशाली सामंतचं “अशी कोकणची चेडवा हो नाखवा, हिच्या घोवाला कोकण दाखवा” हे गाणं जोडलं आहे. तर, कॅप्शनमध्ये “कोकण…” असं लिहिलं आहे. या व्हिडीओमध्ये हे जोडपं सुरुवातीला भातशेतीत फिरताना आणि त्यानंतर घराबाहेरच्या झोपाळ्यावर बसून गप्पा मारत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : ‘प्रेमाची गोष्ट’ला टाकलं मागे! ‘बिग बॉस मराठी’ची ऑनलाइन TRP मध्ये मोठी झेप; पाहा संपूर्ण यादी…

सिद्धार्थ-तितीक्षाच्या ( Titeeksha Tawde ) व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “स्वर्गाहून सुंदर कोकण”, “सुंदर जोडी” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या जोडप्याच्या व्हिडीओवर केल्या आहेत. याशिवाय अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांनी या व्हिडीओवर कमेंट करत “गोड…” असं म्हटलं आहे.