Tu Hi Re Maza Mitwa Star Pravah Serial : ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेमध्ये ईश्वरीचं मनाविरुद्ध अर्णवशी लग्न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. खरंतर, ईश्वरीच्या मनात अर्णवबद्दल राकेश जाणूनबुजून गैरसमज निर्माण करतो. मात्र, अर्णव हळुहळू बायकोच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा करतो. आता अर्णव-ईश्वरी यांच्यात चांगली मैत्री झालेली आहे. आता एकत्र मिळून राकेशला धडा शिकवायचा असं या दोघांनीही ठरवलं आहे.

लग्नानंतर राकेशने अनेकदा ईश्वरीला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय राकेशनेच अर्णववर हल्ला करण्यासाठी देखील सुपारी दिली होती. मात्र, ईश्वरी वेळेवर पोहोचल्याने अर्णवचा जीव वाचला. आता दोघांमधले गैरसमज दूर झाल्याने, आता तरी ईश्वरीला अर्णवचं खरं प्रेम समजूदेत अशी इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली होती. अखेर मालिकेत हे नवीन वळण लवकरच पाहायला मिळेल.

ईश्वरी व अर्णव या दोघांनाही एका मुलाखतीत खोचक प्रश्न विचारला जातो. “ईश्वरी तुम्ही ठरलेलं लग्न मोडून फक्त पैशांसाठी अर्णव यांच्याशी लग्न केलंय का?” हा प्रश्न ऐकताच अर्णव क्षणाचाही विलंब न करता म्हणतो, “माझ्या ईश्वरीच्या मनाची श्रीमंती…माझ्या पैशांत कधीच मोजता येणार नाही.”

अर्णवने मुलाखतीत ‘माझी ईश्वरी’ असा उल्लेख केल्यामुळे ईश्वरी प्रचंड आनंदी होते. तिच्या मनात रात्रंदिवस तोच विचार येत असतो. ईश्वरी मनातल्या मनात म्हणते, “मला सरांचे सारखे भास होत आहेत हे प्रेम तर नाही ना…”

ईश्वरीला ती अर्णवच्या प्रेमात पडल्याची जाणीव अखेर झालेली आहे. आता ती नवऱ्यासमोर आपल्या प्रेमाची कबुली केव्हा देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेचा हा विशेष भाग ७ आणि ८ नोव्हेंबरला प्रसारित केला जाईल.

दरम्यान, प्रेक्षकांनी या प्रोमोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “फायनली माझी ईश्वरी”, “मोस्ट Awaited Promo”, “यार फायनली हा ट्विस्ट आला बाबा”, “हाय…माझी ईश्वरी किती गोड बोलतोय अर्णव”, “वॉव प्रोमो आहे हा”, “फायनली ईशू आणि ASR ची लव्हस्टोरी सुरू होणार” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.