Tula Shikvin Changlach Dhada : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत प्रेक्षकांना लवकरच गोकुळाष्टमी विशेष भाग पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका निर्णायक वळणावर आहे. अक्षराने अधिपतीला प्रेमाची कबुली दिल्यापासून दोघांमध्ये प्रेम बहरत असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, अक्षरा-अधिपती फुकेतला असताना इकडे चारुहास भुवनेश्वरीला घराबाहेर काढतो.
अधिपती परदेशातून परतल्यावर सर्वप्रथम आईसाहेब म्हणजेच भुवनेश्वरी कुठे आहे? याबद्दल चौकशी करतो. पण, ती नेमकी कुठे गेलीये याचा पत्ता कुठेच लागत नाही. अशातच एके दिवशी अक्षराला बाजारात जात असताना भुवनेश्वरीसारखी बाई दिसते. या बाईला पाहताच अक्षरा “भुवनेश्वरी मॅडम…” अशा हाका मारू लागते. परंतु, इथेच एक मोठा ट्विस्ट येतो आणि हा ट्विस्ट म्हणजे ही बाई भुवनेश्वरी नसून चारुलता अशी स्वत:ची ओळख करून देते.
हेही वाचा : जेलमध्ये जाताच जान्हवीचा गेम बदलला! निक्कीच्या विरोधात लढणार; तर आर्या अन् अरबाज म्हणाले, “आपली दुश्मन…”
चारुलता घेणार अक्षराची बाजू
चारुलता ही चारुहासची घरी बायको आणि अधिपतीची खरी आई असते. अक्षरा चारुलताला घरी आणते. दुसरीकडे आयुष्याला कंटाळून चारुहास जीव द्यायला निघालेला असतो. परंतु, चारुलताला पाहून त्याच्या मनात जगण्याची एक नवीन उमेद जागी होते. चारुलता संपूर्ण घर फिरते, तिच्या सुनेचं म्हणजेच अक्षराचं कौतुक करते आणि सर्वांकडे अधिपतीविषयी चौकशी करते. आता लवकरच चारुलताचं एक वेगळं रुप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
गोकुळाष्टमीच्या दिवशी सूर्यवंशींच्या घरी ( Tula Shikvin Changlach Dhada ) बाळकृष्णाची मनोभावे पूजा केली जाते. अक्षरा व चारुलता एकत्र पाळणा गातात. यानंतर घरी आलेल्या बायका अक्षराला सांगतात, “आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या घरात पाळणा हललाय. बरं का अक्षरा…. आता घरात खरोखरीचा पाळणा पण हलूदे…काय ओ तुमच्या सूनबाईंमध्ये काही प्रॉब्लेम तर नाही ना?” यावर चारुलता लगेच उठते आणि म्हणते, “थांबा कोणत्या आधारावर तुम्ही हे सगळं ठरवून मोकळ्या झालात की तिच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. हे बघा तुम्हाला कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण देण्याचं काहीच कारण नाहीये. तुम्ही आता इथून निघा…”
हेही वाचा : ५९ वर्षांचा आमिर खान करणार तिसरं लग्न? म्हणाला, “सध्या माझ्या आयुष्यात खूप नाती…”
चारुलताने सांगितल्यावर सगळ्या बायका घरातून निघून जातात. मालिकेच्या या नव्या प्रोमोत सासू-सुनेच्या बॉण्डिंगचं नेटकऱ्यांनी सुद्धा कौतुक केलं आहे. आता येत्या काळात मालिका ( Tula Shikvin Changlach Dhada ) काय वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.