Tejashri Pradhan Talks About Marriage : तेजश्री प्रधान ही मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती ‘झी मराठी’वरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत मुख्य नायिकेची भूमिका साकारत आहे. या मालिकेत सध्या स्वानंदी व समर यांचा लग्नसोहळा सुरू आहे. अशातच तेजश्रीने खऱ्या आयुष्यात लग्न करण्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत सध्या लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात सुरू असून, लवकरच स्वानंदी व समर लग्नबंधनात अडकणार आहेत. याचं काही शूटिंग गोव्यातही झालं आहे. अशातच तेजश्री व सुबोध यांनी नुकतीच मुलाखत दिली असून, त्यामध्ये त्यांनी गोव्यात शूटिंग करण्याचा अनुभव सांगितला आहे. या मालिकेत समर व स्वानंदी यांचं डेस्टिनेशन वेडिंग होत आहे.
मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक आहे – सुबोध भावे
तेजश्री व सुबोधने ‘कलाकृती मीडिया’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये सुबोध व तेजश्रीला इंडस्ट्रीत तुमचे कोणते मित्र आहेत, ज्यांच्या लग्नासाठी तुम्ही उत्सुक आहात, असं विचारल्यानंतर सुबोध म्हणाला, “मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक आहे. तेव्हा आम्ही पुन्हा गोव्यात येऊ डेस्टिनेशन वेडिंगसाठी.” त्यावर तेजश्री नाही, असं म्हणाली.
तेजश्रीची लग्नाबद्दल प्रतिक्रिया
तेजश्रीला त्यानंतर तिला डेस्टिनेशन वेडिंग करायला आवडेल का, असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “अरे बापरे! हा तर फार फार पुढचा प्रश्न आहे. त्याबद्दल खरंच काही विचार केला नाही.” त्यामुळे सध्या तरी तेजश्रीने लग्नाला घेऊन कुठला विचार नसल्याचं म्हटलं आहे.
सुबोधला पुढे त्याच्या लग्नातील एक आठवण विचारल्यानंतर तो म्हणाला, “मला आता माझ्या लग्नाबद्दल फार काही आठवत नाही. पण एवढं माहीत आहे की, माझ्या बायकोनं माझ्या आजीची नऊवारी साडी नेसलेली आणि त्यात ती खूप गोड दिसत होती.”
दरम्यान, वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेतील स्वानंदी व समरच्या लग्नानिमित्त त्यांचं नुकतंच केळवण पार पडल्याचं दिसलं. या केळवणाला वाहिनीवरील इतर मालिकांमधील कलाकारांनीही हजेरी लावली होती.
