‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत लवकरच मुक्ता आणि सागरचं प्रेम बहरताना दिसणार आहे. त्यामुळे आता मुक्ता आणि सागरचे रोमँटिक सीन्स पाहायला मिळणार आहेत. अशातच तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचे दिग्दर्शक बदलल्याचं समोर आलं आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचं दिग्दर्शक एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे पती होते. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेमध्ये सोयराबाईंच्या भूमिकेत झळकलेली स्नेहलता वसईकर हिचे पती गिरीश वसईकर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत होते. पण आता विघ्नेश कांबळे यांनी या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा हाती घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केली होती.

हेही वाचा – Video: लवकरच बंद होणाऱ्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील कलाकारांचा ‘अंगारों’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

अलीकडेच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील या लोकप्रिय मालिकेने २५० भागांचा टप्पा ओलांडला. यावेळी मालिकेतील कलाकार मंडळींनी केक कापून सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनचा फोटो शेअर करत विघ्नेश कांबळे यांनी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा हाती घेतल्याचं जाहीर केलं. “नवीन टीम, नवी काम”, असं त्यांनी फोटोवर लिहिलं होतं.

हेही वाचा – “आमचा तुम्हाला बिनशर्त पाठिंबा!” तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी खास पोस्ट; म्हणाली, “इतरांसाठी जगणारा माणूस…”

दरम्यान, विघ्नेश कांबळे यांनी याआधी बऱ्याच मराठी व हिंदी मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांनी ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचं देखील काही वर्षे दिग्दर्शन केलं होतं. पण काही महिन्यांपूर्वी त्यांनी ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका सोडली.

हेही वाचा – Video: शशांक केतकरच्या तक्रारीनंतर एका रात्रीत BMCची कारवाई, आभार मानत म्हणाला, “फक्त तोच भाग नाही, अख्खी मुंबई…”

मग विघ्नेश कांबळे यांनी हिंदी मालिकेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी हाती घेतली. ‘स्टार प्लस’च्या ‘मीठा-खट्टा प्यार हमारा’ या मालिकेचं दिग्दर्शन ते करत होते. आता ते पुन्हा एकदा ‘स्टार प्रवाह’ परिवारात सामीर झाले आहेत. ‘तुझेच मी गीत गात आहे’ व्यतिरिक्त त्यांनी ‘स्टार प्रवाह’च्या ‘मुरांबा’ मालिकेचं देखील दिग्दर्शन काही काळासाठी केलं होतं.