एखादा कलाकार चित्रपट सोडून जातो याची चर्चा सगळीकडे होते मात्र टीव्ही विश्वात हे नवे नाही. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील मालिका मागील १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील काही कलाकारांनी ही मालिका सोडली. या मालिकेत सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी जेव्हा ही मालिका सोडली तेव्हा प्रेक्षकांना धक्का बसला. नेक वर्षांपासून एकच भूमिका करत असल्याचा कंटाळा आल्याने त्यांनी मालिका सोडली अशी प्राथमिक माहिती सांगण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शैलेश लोढा यांनी सिद्धार्थ कननच्या कार्यक्रमात उपस्थित असताना त्यांनी मालिका सोडण्याबद्दल असे सांगितले की ‘गेली १४ वर्ष मी मालिकेत होतो. या मालिकेबद्दल मी खूप भावुक आहे. मी रोज सेटवर जायचो, काम करायचो. मी तसा कोणाची वाट बघणारा नाही मात्र या मालिकेसाठी मी वाट बघितली. माझा नाईलाज होता, मी एक दिवस सांगणार आहे मी मालिका का सोडली आहे ते, योग्य वेळेची मी वाट बघत आहे’. शैलेश आणि या मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांच्यामध्ये वाद झाल्याने त्यांनी काम करण्यास नकार दिला असेही बरेचसे लोक म्हणत होते.

वाघा बॉर्डरवर ‘हर हर महादेव’ची गर्जना! सैनिकांबरोबर कलाकारांनी साजरी केली दिवाळी

शैलेश लोढा मालिकेतून बाहेर पडल्यावर त्यांच्या जागी अभिनेता सचिन श्रॉफ तारक मेहता भूमिका साकारत आहे. शैलेश लोढा अभिनयासह लेखनदेखील करतात. त्यांना कविता करायचा छंद आहे. त्यांचे कविता वाचनाचे कार्यक्रम वर्षभर सुरु असतात. शैलेश लोढा मूळचे जयपूरचे आहेत. या मालिकेसाठी त्यांनी मुंबई गाठली होती. मध्यंतरी राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर त्यांनी एक खास पोस्ट शेअर केली होती.

आत्तापर्यंत दिशा वकानी, भव्य गांधी, शैलेश लोढा, नेहा मेहता, निधी भानुशाली, गुरुचरण सिंह अशा कलाकारांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सोडली आहे. मालिकेतील लोकप्रिय पात्र दयाबेन उर्फ दिशा वकानीदेखील मालिकेत परतत नाही, मालिकेचे चाहते तिची वाट बघत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why actor poet shailesh lodha quit taarak mehta ka ooltah chashmah show spg