कपिल शर्मा आणि भारती सिंग बऱ्याच काळापासून एकत्र काम करत आहेत. दोघेही उत्तम कॉमेडियन आहेत आणि जेव्हा ते दोघेही शोमध्ये एकत्र यायचे तेव्हा ते लोकांना खूप हसवायचे. प्रेक्षकांना त्यांची कॉमिक जोडी खूप आवडायची. आता भारती सिंग एका मुलाखतीत कपिल शर्माबद्दल बोलली आहे.

भारती सिंगने कपिल शर्माचे कौतुक केले आहे आणि म्हटले आहे की, त्याने तिला आयुष्यात खूप काही शिकवले आहे. जेव्हा भारती सिंगला विचारले गेले की तिने कपिल शर्माचा शो का सोडला, तेव्हा भारती सिंगने यावर आता उत्तर दिले आहे.

फिल्मीबीटशी बोलताना भारती सिंग म्हणाली, “मला कपिल भाई खूप आवडतात. ते माझे गॉडफादर आहेत. त्यांनी मला आयुष्यात खूप काही शिकवले आहे. मी गरोदर असताना कपिल शर्मा शो सोडला, कारण मला माहीत होते की ते माझे पहिले मूल आहे, मी खूप घाबरले होते; कारण काहीही झाले तरी माझे कुटुंबीय म्हणतील की ती तुझी चूक आहे, म्हणूनच मी ब्रेक घेतला.”

भारती सिंग पुढे म्हणाली, “त्यानंतर हा सीझन आला. मला यातही ऑफर मिळाली, पण मी लाफ्टर शेफ करत होते. एका वेळी फक्त एकच शो करण्याची माझी सवय आहे. मी प्रामाणिक आहे. कलर्सने सांगितलं होतं की लाफ्टर शेफ येणार आहे, तर तुम्ही कुठेही काहीही करू नका, मी पूर्णपणे बेफिकीर आहे, मी प्रामाणिक आहे. मी माझ्या मित्रांप्रतीदेखील प्रामाणिक आहे. मी हर्षप्रतीदेखील प्रामाणिक आहे. मी माझ्या मुलाप्रतीदेखील प्रामाणिक आहे आणि मी प्लॅटफॉर्मप्रतीदेखील प्रामाणिक आहे.” कपिल शर्माचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ आता ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रसारित होत आहे.

कॉमेडियन अभिनेत्री भारती सिंगने मेहनतीने या इंडस्ट्रीमध्ये स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे. हे स्थान मिळवण्यासाठी तिने खूप संघर्ष केला आहे. आज भारती एक लक्झरी आयुष्य जगतेय आणि प्रचंड पैसाही कमवतेय. भारती आणि हर्ष ही एक हीट जोडी आहे. दोघेही एकत्र पॉडकास्टदेखील करतात. त्यांच्या पॉडकास्टबरोबरच लोकांना त्यांचे ब्लॉगदेखील खूप आवडतात.

भारती आणि हर्ष लिंबाचिया ही जोडी टीव्हीवरील सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक आहे. खऱ्या आयुष्यात दोघांनाही कितीही अडचणी येत असल्या तरी ते चाहत्यांना हसवण्याची एकही संधी सोडत नाहीत. या जोडप्याप्रमाणेच त्यांची प्रेमकहाणीही खूप गोंडस आहे. त्यांची भेट कॉमेडी सर्कसदरम्यान झाली होती. हर्ष भारतीसाठी स्क्रिप्ट लिहायचा, तेव्हापासून त्यांची मैत्री झाली.