Yek Number Box Office Collection : मराठी बॉक्स ऑफिसवर १० ऑक्टोबर रोजी ‘येक नंबर’ सिनेमा प्रदर्शित झाला. गेल्या काही महिन्यांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर आधारित एक सिनेमा येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर या सगळ्या चर्चा सुरू असतानाच अभिनेत्री तेजस्विनी पंडितने ‘येक नंबर’ चित्रपटाची घोषणा केली. यामध्ये अभिनेता धैर्य घोलपने प्रमुख भूमिका साकारली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धैर्य यापूर्वी ‘अथांग’ नावाच्या वेब सीरिजमध्ये झळकला होता. ‘येक नंबर’ हा मुख्य अभिनेता म्हणून त्याचा पहिलाच चित्रपट आहे. तर, अभिनेत्री तेजस्विनी पंडितने या सिनेमाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या ( Yek Number) ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाला स्वत: राज ठाकरे देखील उपस्थित राहिले होते. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय जादू करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची आकडेवारी आता समोर आली आहे. प्रदर्शित झाल्यापासून पहिल्या पाच दिवसांमध्ये ‘येक नंबर’ चित्रपटाने किती कमाई केली जाणून घेऊयात…

हेही वाचा : ‘बिग बॉस’च्या पहिल्याच एपिसोडला रेकॉर्डब्रेक TRP! अभिनेत्याची मोठी घोषणा; म्हणाला, “होस्ट म्हणून शेवटचा सीझन…”

‘येक नंबर’ चित्रपटाचं ५ दिवसांचं कलेक्शन

इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार १० ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी १७ लाखांची कमाई केली होती. यानंतर अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने ९ लाख, १६ लाख आणि १७ लाखांची कमाई केली आहे. तर, सोमवारी पाचव्या दिवशी या चित्रपटाने १३ लाख कमावले आहेत. यामुळे ‘येक नंबर’ चित्रपटाने पाच दिवसांत एकूण ७२ लाख कमावल्याचं ‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टमधून समोर आलं आहे. मात्र, अद्याप चित्रपटाच्या ( Yek Number ) टीमकडून कलेक्शनची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

हेही वाचा : Video : जवळचा मित्र जाण्याचं दुःख, राज ठाकरे अन् शर्मिला ठाकरेंनी घेतले अतुल परचुरेंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन, पाहा व्हिडीओ

‘येक नंबर’ मराठी चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन ( Yek Number Box Office Collection )

दरम्यान, ‘येक नंबर’ ( Yek Number) चित्रपटाबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये धैर्य घोलप, सायली पाटील, तेजस्विनी पंडित ( tejaswini pandit ), पुष्कर श्रोत्री, संजय मोने, आनंद इंगळे या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yek number marathi movie produce by tejaswini pandit box office collection reports sva 00