Zee Marathi : ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या काही दिवसांत नवनवीन मालिका सुरू होणार आहेत. नुकतीच वाहिनीकडून तेजश्री प्रधानच्या कमबॅकची घोषणा करण्यात आली आहे. तेजश्री व सुबोध भावे यांची ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय येत्या ३० तारखेपासून वाहिनीवर ‘कमळी’ ही नवीन मालिका देखील प्रक्षेपित केली जाणार आहे.

सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘कमळी’ या मालिकेची जोरदार चर्चा सुरू आहे. विजया बाबर आणि निखिल दामले यांची फ्रेश जोडी या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘कमळी’ ही खेडेगावातील खूप हुशार मुलगी असते. महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात गेल्यावर तिच्यासमोर कोणत्या समस्या उद्भवणार, तिचा नेमका भूतकाळ काय असेल? हा संपूर्ण प्रवास प्रेक्षकांना ‘कमळी’ मालिकेत पाहायला मिळणार आहे.

‘कमळी’ मालिका ‘झी तेलुगू’वरील लोकप्रिय सीरियल ‘मुत्याला मुग्गू’चा रिमेक असल्याच्या चर्चा आहेत. ३० जूनपासून ही नवीन मालिका प्रसारित होणार असल्याने वाहिनीवर मोठा बदल होणार आहे.

येत्या ३० जूनपासून ही ‘कमळी’ सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज होणार आहे. या मालिकेच्या प्रसारणाची वेळ रात्री ९ वाजताची ठरली आहे. सध्या या वेळेला ‘शिवा’ ही मालिका प्रसारित केली जाते. त्यामुळेच नव्या मालिकेसाठी ‘शिवा’ची वेळ बदलली जाणार आहे.

३० जूनपासून ‘शिवा’ मालिका रात्री नऊऐवजी ९.३० वाजता प्रसारित केली जाणार आहे. याबद्दल ‘शिवा’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूर्वा कौशिकने स्वत: पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. मालिकेत आता शिवा आणि तिच्या सासूबाईंचं सुंदर बॉण्डिंग पाहायला मिळणार आहे.

Zee Marathi – ‘शिवा’ मालिकेची वेळ बदलली, पूर्वा कौशिकने पोस्ट शेअर करत दिली माहिती

दरम्यान, ‘कमळी’ या नव्या मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये विजया बाबर आणि निखिल दामले यांच्यासह केतकी कुलकर्णी, योगिनी चौक, इला भाटे, अनिकेत केळकर असे दमदार कलाकार एकत्र झळकणार आहेत. आता या मालिकेला प्रेक्षक कसे प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.