सध्या छोट्या पडद्यावर लागोपाठ नवनवीन मालिका येत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वाहिन्या नवनवीन मालिकांची घोषणा करत आहेत. काही नव्या मालिकांमधून नवे चेहरे तर काही नव्या मालिकांमध्ये जुने चेहरे भेटीस येत आहेत. त्यामुळे सध्या मराठी मालिकाविश्वात नव्या मालिकांचा धुमाकूळ सुरू आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. अशातच आता आणखी एका नव्या भयावह मालिकेची घोषणा करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – टीआरपीच्या शर्यतीत टॉप-५मध्ये असूनही ‘स्टार प्रवाह’वरील ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, ‘ही’ नवी मालिका घेणार जागा

‘झी युवा’ने भयावह मालिकेची घोषणा केली आहे. भयाची छाया सगळीकडे पसरणार, तुमची रात्रीची झोप उडणार अशी नवीन मालिका ‘झी युवा’वर सुरू होणार आहे. याचा प्रोमो ‘झी युवा’च्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये भयावह दृश्य दिसत आहेत.

भय आणि धरकापाने रात्रीची झोप उडवणाऱ्या भय कथा ‘झी युवा’च्या नव्या मालिकेतून पाहायला मिळणार आहेत. झी हॉरर शो ‘जशी आहे तशी’ असं नव्या मालिकेचं नाव आहे. २७ मेपासून रात्री १० वाजता ‘झी युवा’वर ही भयावह मालिका प्रसारित होणार आहे.

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकलेल्या अभिनेत्रीने आई-वडिलांना दिलं खास सरप्राइज, घेतला ‘सुवर्णरथ’

हेही वाचा – ‘सरफरोश’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण! अभिनेत्री सुकन्या मोनेंची खास पोस्ट, जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणाल्या, “आमिर खान…”

दरम्यान, याआधी बऱ्याच हॉरर मराठी मालिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ‘रात्रीस खेळ चाले’, ‘कणाकणाने घास घेते…ग्रहण’, ‘ती परत आलीये’, ‘सांग तू आहेस ना’, ‘एक तास भुताचा’ अशा बऱ्याच हॉरर मराठी मालिका लोकप्रिय ठरल्या. आता ‘झी युवा’ची ‘जशी आहे तशी’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते की नाही? हे येत्या काळातच स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee yuva announced new horror serial jashi aahe tashi pps