बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीची बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन २’ ची प्रतिक्षा करणाऱ्या प्रेक्षकांसाठी आनंदाची गोष्ट घडली. ही वेब सीरिज आज म्हणजेच ४ जून रोजी रात्री १२ वाजता प्रदर्शित होणार होती. बॉलिवूड अभिनेते मनोज वाजपेयीची बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन २’ ची करणाऱ्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. ही वेब सीरिज आज म्हणजेच ४ जून रोजी रात्री १२ वाजता प्रदर्शित होणार होती. या सीरिजचे चाहते १२ वाजण्याची उत्सुकतेने वाट पाहत असताच अॅमेझॉन प्राईमने अचानक २ तास आधी ही सीरिज प्रदर्शित करूण चाहत्यांना सुखद धक्का दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘द फॅमिली मॅन २’ ही बहुप्रतिक्षित वेब सीरिज २ तास आधी प्रदर्शित झाल्याने चाहत्यांनी त्यांचा आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. अनेकांनी ट्वीट करत अॅमेझॉन प्राइमचे आभार मानले तर इतरांनी पहिला एपिसोड पाहताच त्याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. तर काही नेटकरी म्हणाले की वेब सीरिज तामिळ आणि तेलुगू भाषेत नाहीये. मनोज वाजपेयीच्या अभिनयाची स्तुती करत एक नेटकरी म्हणाला, “द फॅमिली मॅन २ प्रदर्शित झाला आहे. या सीरिजमध्ये मनोज वाजपेयीचा अभिनय हा अप्रतिम आहे”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी मनोज वाजपेयी आणि ‘द फॅमिली मॅन २’ ची स्तुती केली आहे.

द फॅमिली मॅन कुठे पाहता येईल?

‘द फॅमिली मॅन २’ अ‍ॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. त्यासाठी अॅमेझॉन प्राईमचे सबस्क्रिप्शन देखील घ्यावे लागेल. या सबस्क्रिप्शनसाठी आपल्याला ९९९ रुपये द्यावे लागतील. त्याची वैधता ही १ वर्षाची आहे.

आणखी वाचा : सलमान आणि केआरकेच्या भांडणात गोविंदाला खेचले, संतप्त प्रतिक्रिया देत म्हणाला…

दरम्यान, ‘द फॅमिली मॅन २’मध्ये मनोज वाजपेयी सीनिअर एजंट आणि विश्लेषक श्रीकांत तिवारीची भूमिका साकारत आहे. त्याच्याबरोबर अभिनेत्री समांथा अक्किने, प्रियामणि, शरिब हाश्मी, सीमा बिस्वास या मनोज वाजपेयीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दिवंगत अभिनेते असिफ बसरा यांनी देखील या सीरिजमध्ये भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The family man 2 drops on amazon prime a day before schedule fans celebrate on twitter dcp