छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणून ‘कपिल शर्मा शो’ ला ओळखले जाते. या शोचा सूत्रसंचालक कपिल शर्माचे विनोद ऐकून सर्वांना हसू अनावर होते. या शोमध्ये अनेक कलाकार त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावत असतात. नुकतंच या शो मध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी, बादशाह आणि मनोज मुंतशिर यांनी हजेरी लावली. यावेळी शिल्पा शेट्टीने कपिल शर्माची जबरदस्त खिल्ली उडवली. नुकतंच ‘सोनी टिव्ही’ने याबाबतचा एक प्रोमो शेअर केला आहे.
‘सोनी टिव्ही’ने नुकतंच ‘द कपिल शर्मा’च्या आगामी भागाचा एक प्रोमो शेअर केला आहे. यात कपिल शर्माच्या आगामी भागामध्ये ‘इंडियाज गॉट टॅलेंट’चे तीन परिक्षक पाहुण्यांनी हजेरी लावली आहे. द कपिल शर्मा शोमध्ये शिल्पा शेट्टी, बादशाह आणि मनोज मुंतशीर हे सहभागी होताना दिसत आहे. यावेळी शिल्पा शेट्टी ही कपिलच्या जुन्या वादग्रस्त ट्विटवरुन त्याची खिल्ली उडवताना दिसत आहे.
नुकतंच या शोचा एक प्रोमो समोर आला आहे. या व्हिडीओत शिल्पा शेट्टी, बादशाह आणि मनोज मुंतशीर शो मध्ये एंट्री करतात आणि त्यावेळी कपिल हा शिल्पा शेट्टीच्या पाया पडतो. त्यानंतर ते दोघेही डान्स करताना दिसतात. त्यानंतर कपिल म्हणतो की, ‘इंडियाज गॉट टॅलेंटचे यंदाचे पर्व फार जबरदस्त सुरु आहे. हे सर्वजण एकापेक्षा एक टॅलेंट असलेले व्यक्ती शोधत आहे. पण अखेर यांना माहिती पडले की हे ज्या टॅलेंट माणसाला शोधत आहे तो तर दुसरीकडे कुठेतरी आहे.’
कपिल शर्माचे हे बोलणे ऐकल्यानंतर शिल्पा शेट्टी त्याची खिल्ली उडवते. शिल्पा शेट्टी म्हणते की, ‘हा प्राणी खूपच टॅलेंटेड आहे. तो खूप छान कॉमेडी करतो. त्यांच्याकडे यापेक्षा चांगले टॅलेंट आहे. तुम्हाला त्याच्या या टॅलेंटबद्दल माहिती नाही. अरे हे फार चांगले मनाला भिडणारे ट्विट करतात.’ यावर कपिल म्हणतो, ‘नाही आजकाल मी ते फार कमी करतो.’
त्यावर शिल्पा शेट्टी त्याला सांगते की, ‘अरे सर्व दारुची दुकाने तर खुली झाले आहेत.’ शिल्पा शेट्टीची ही मस्करी पाहून तो म्हणतो की, ‘आज तू माझी खिल्ली उडवायची आहे असा विचार करुन आली आहेस की काय?’ असा प्रश्न कपिल तिला विचारतो.
हिऱ्याची अंगठी देत सुकेशने केले होते जॅकलिनला प्रपोज, अंगठीवर लिहिले होते खास शब्द
दरम्यान कॉमेडियन कपिल शर्माच्या वादग्रस्त ट्विटचा किस्सा अनेकांना माहिती आहे. काही वर्षांपूर्वी कपिल शर्माने दारुच्या नशेत मुंबई महापालिकेविरोधात वादग्रस्त ट्विट केले होते. त्यामुळे तो अडचणीत सापडला होता. या वादावर शिल्पा शेट्टीने कपिलची खिल्ली उडवली आहे.