बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने सेलिब्रिटींच्या आवडत्या ठिकाणी घर खरेदी केल आहे. टायगरचे हे घर मुंबईतील रुस्तमजी पॅरामाउंट, खार वेस्टमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. मुंबईतील हा परिसर सगळ्यात महागडा परिसर आहे. या सोसायटीत २,३,४,५,६ आणि ८ बिएचके फ्लॅट आहेत. या घरात टायगर आणि त्याचे संपूर्ण कुटुंब राहणार आहे.
या आधी टायगर आणि त्याच संपूर्ण कुटुंब हे कार्टर रोडवरील एका सोसायटीत भाड्याने राहत होते. आता टायगरने ८ बिएचके म्हणजेच ८ बेडरूमचं घर खरेदी केलं आहे. यात जिम, गेम रूम, स्विमिंग पूल सारख्या सगळ्या सुविधा आहेत. टागरच्या या घरातून अरबी समुद्र दिसतो. या सोसायटीत फिटनेस जीम, आर्टिफिशियल रॉक क्लाइम्बिंगसारख्या अनेक गोष्टी आहेत. एवढंच नाही तर स्टार गेझिंग डेक सुद्धा आहे. जिथे जाऊन सोसायटीतील लोक तारे पाहू शकतात. या सोसायटीत घर घेण्याची इच्छा रानी मुखर्जी, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, मेघना घई पुरी, दिशा पटानी या सेलिब्रिटींना आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी टायगर ‘बागी ३’ या चित्रपटात दिसला होता. यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने त्याचे देशभक्तीवरील एक गाणं प्रदर्शित झाले होते. हे गाणं ‘वंदे मातरम्’ गाण्याचं एक नवीन व्हर्जन असून टायगरने स्वत: गायलं आहे. दरम्यान, २ दिवसांआधी टायगरचा आगामी चित्रपट ‘गणपत’चा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट २३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात टायगरसोबत कृती सेनॉन दिसणार आहे.