अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’वर ट्विंकल खन्नाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “चित्रपटाचा पूर्वार्ध हसवतो, पण नंतर…”

तसेच हा चित्रपट तिला आवडला की नाही हे देखील तिने सांगितले आहे.

अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’वर ट्विंकल खन्नाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “चित्रपटाचा पूर्वार्ध हसवतो, पण नंतर…”
अक्षय कुमार ट्विंकल खन्ना

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा बहुचर्चित रक्षाबंधन हा चित्रपट काल गुरुवारी (११ ऑगस्ट) प्रदर्शित झाला. भावा-बहिणीच्या नात्याचे महत्त्व सांगणारा पवित्र सण म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतंच अक्षयची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने या चित्रपटाबद्दल तिचे मत व्यक्त केले आहे. तसेच हा चित्रपट तिला आवडला की नाही हे देखील तिने सांगितले आहे.

अक्षय कुमारचा रक्षाबंधन हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्नाने बघितला. यानंतर ट्विंकलला अक्षयचा हा चित्रपट कसा वाटला? याबद्दल विचारण्यात आले. यावर उत्तर देताना ती म्हणाली, “या चित्रपटाचा पूर्वार्ध पाहून मी खूप हसले. पण दुसऱ्या भागाने मला अक्षरश: रडवले. हा चित्रपट अशा भारताबद्दल आहे जो आपण अस्तित्वात नाही असे भासवतो. तसेच ते खरे नसावे अशी इच्छाही व्यक्त करतो.”

चित्रपटांवर बहिष्कार टाकणाऱ्यांवर सुनील शेट्टीची प्रतिक्रिया, म्हणाला “अक्षय कुमार आणि आमिर खान…”

“हल्ली आपण हुंडा म्हणून विविध भेटवस्तू मागायला सुरुवात केली आहे. पण मी आनंद एल.रॉयचे कौतुक करते कारण त्यांनी त्यांच्या क्षमतेने एक वेगळेच जग आपल्यासमोर ठेवले आहे. ज्यात भाऊ-बहिण एकमेकांना आधार देतात आणि सोबत एकमेकांना त्रासही देतात. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात नक्कीच प्रवेश करेल. त्यात तितकी ताकद आहे. रक्षाबंधन हा चित्रपट तुम्हाला सुरुवातीला खूप हसवतो आणि त्यासोबत न रडल्याशिवाय चित्रपटगृहातून बाहेरही पडून देत नाही”, असेही ट्विंकल खन्ना म्हणाली.

कोण होणार राज्याचा मुख्यमंत्री? ‘मी पुन्हा येईन’चे महाएपिसोड्स लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

दरम्यान अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांची मुख्य भूमिका असलेला ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट नुकतंच प्रदर्शित झाला आहे. त्यासोबतच करीना कपूर आणि आमिर खान यांचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट देखील शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. यामुळे बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षक यातील कोणत्या चित्रपटाला पसंती देतात, कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“…म्हणून मलायकाशी अफेअर असल्याचं सर्वांपासून लपवलं” अर्जुनने केला मोठा खुलासा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी