आश्रमातील महिला अनुयायीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूला मंगळवारी(३१ जानेवारी) न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आसाराम बापूचा फोटो शेअर केला आहे. “याच्यासारख्या घाणेरड्या माणसासाठी जन्मठेपेची शिक्षा पुरेशी नाही. पुढच्या जन्मातही याने जन्मठेपेची शिक्षा भोगली पाहिजे”, असं उर्फीने म्हटलं आहे. उर्फी अनकेदा समाजातील घडामोडींवर व्यक्त होताना दिसते.

हेही वाचा>> लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा; गांधीनगर सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

आसाराम बापूला याआधीही २०१८मध्ये एका वेगळ्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २०१३ साली जोधपूर आश्रमातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. याप्रकरणीही न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

हेही वाचा>> शिव ठाकरेला आमदार बच्चू कडूंचा पाठिंबा; ‘बिग बॉस’ स्टारचा पान टपरीवरील ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाले…

आता जन्मठेप मिळाली ते प्रकरण काय?

२०१३ मध्ये सुरतमधील दोन बहिणींनी आसाराम बापू आणि नारायण साई यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. २००२ ते २००५ दरम्यान नारायण साईने वारंवार तिच्यावर बलात्कार केल्याचे लहान बहिणीने तक्रारीत सांगितलं होतं. सुरतमधील आसारामच्या आश्रमात राहात असताना तिच्यावर बलात्कार झाला, असं पीडित मुलीने सांगितलं होतं. दुसरीकडे, मोठ्या बहिणीने तक्रारीत आसारामवर बलात्काराचा आरोप केला होता. अहमदाबाद येथील आश्रमात आसारामने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केल्याचं पीडितेनं सांगितले. दोन्ही बहिणींनी पिता-पुत्राच्या विरोधात स्वतंत्र तक्रारी केल्या होत्या.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urfi javed reacts on life imprisonment to asaram bapu kak