‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद ही नेहमी तिच्या कपड्यांमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. तिचे फॅशन सेन्स आणि ड्रेस नेहमीच चर्चेत असतात. उर्फीने तिच्या बोल्ड अंदाजासोबतच तिच्या हटके स्टाइलने अनेकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. कधी ब्रॉ फ्लॉन्ट केल्याने तर कधी पॅन्टचं बटन न लावल्याने तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र आता उर्फी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उर्फी ही सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर ती विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. उर्फी नुकतंच साडी परिधान करत मुंबई विमानतळावर हजेरी लावली. तिचा हा लूक पाहिल्यानंतर अनेकांना धक्काच बसला. विविध बोल्ड लूकमुळे ओळखली जाणाऱ्या उर्फीला साडीत पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले.
आणखी वाचा : उर्फी जावेदची श्रीमंती बॉलिवूडकरांनाही देते टक्कर, एका महिन्याची कमाई माहितीये का?

सध्या सोशल मीडियावर तिच्या या लूकचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती पापाराझींसाठी पिझ्झा देताना दिसत आहे. यावेळी फोटोग्राफर्सची काळजी घेणाऱ्या उर्फीचे कौतुक केले जात आहे. मात्र त्यानंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

मुंबई विमानतळावर साडी परिधान करुन आलेल्या उर्फीने फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोझ दिली. यावेळी एअरपोर्टवर इतकी हवा होती की ज्यामुळे तिच्या साडीचा पदर उडू लागला. तिने अनेकदा तो सांभाळण्याचा प्रयत्न केला पण हवा जास्त असल्याने तो तिच्या खांद्यावरुन खाली घसरला. विमानतळाच्या आत जाईपर्यंत तिला साडीचा पदरच सावरता येत नव्हता. यावेळी एका महिलेने तिला तो पदर सांभाळण्यासाठी मदत केली.

आणखी वाचा : “मी बोल्ड कपडे घालते म्हणून त्यांनी कात्रीने…”, उर्फी जावेदचा खुलासा

उर्फीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकरी तिचे कौतुक करत आहेत. तर काहींनी तिला ट्रोल केले आहे. ‘उर्फीला साडीही नीट नेसता येत नाही,’ अशी कमेंट करत एकाने तिची खिल्ली उडवली आहे. ‘तिने पिझ्झा आणलाय पण पीन लावायला विसरुन गेलीय’, असे एका म्हटले आहे. ‘हिला कोणी तरी सेफ्टी पीन द्या, ही साडी कशी घालतात ते विसरली’, असेही एकाने म्हटले आहे. ‘सांभाळायला येत नाही तर घालते कशाला…?’ असा संतप्त सवालही नेटकरी करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urfi javed saree pallu struggles to stay in place due to heavy wind at the mumbai airport video viral nrp