अभिनेता वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल यांनी अरुणाचल प्रदेशात तिरप आणि लाँगलिएँग जिल्ह्यात लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्यांच्या मदतीसाठी १ लाख रुपयांचा मदतनिधी दिला आहे. वरुण सध्या चित्रपटाच्या चित्रीकऱणासाठी त्या राज्यात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वरुण आपला आगामी चित्रपट भेडिया यासाठी अरुणाचल प्रदेशात चित्रीकरण करत आहे. अमर कौशिक हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. वरुणने हा मदतनिधी उपजिल्हाधिकारी सोमचा लोवांग यांच्याकडे सुपुर्द केला. सोमचा यांच्यावर तिरप इथल्या लोकांच्या मदतकार्याची जबाबदारी आहे.

माहिती मिळत आहे की, कमीतकमी दोन व्यक्तींचा या आगीत सापडून बळी गेला आहे. यात एका ६ वर्षांच्या बालकाचाही समावेश आहे. मार्चमध्ये लाँगलिएँग जिल्ह्यात आग लागली होती. त्यात परिसरातील अनेक घरेही जळाली आहेत.

वरुण आणि नताशा या दोघांचे सोमचा यांच्यासोबतचे फोटो डिप्रो झिरो या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहेत. वरुण आणि नताशासोबतच अभिनेत्री क्रिती सेनन, अभिषेक बॅनर्जी, अमर कौशिक आणि भेडिया या चित्रपटाच्या टीमचेही फोटो आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varun dhavan and his wife donated one lakh rupees for arunachal pardesh vsk