बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या वेगवेगळ्या कारणासाठी सतत चर्चेत असतात. त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात आणि आपल्या कामाबद्दल तसंच पर्सनल आयुष्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी फॅन्स सोबत शेअर करत असतात. नीना गुप्ता या बऱ्याच काळापासून या अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्या त्यांच्या इन्स्टाग्रामवर त्यांचे जुने फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. असाच एक जुना व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला असून तो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

नीना गुप्ता यांनी शेअर केलेला व्हिडीओ त्यांच्या तरुण वयातला आहे. हा व्हिडीओ एका मिनी सीरिजचा आहे. शुक्रवारी ६ ऑगस्ट रोजी नीना यांनी त्यांच्या अधिकृत इनस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्या ट्रेनमधे सगळ्यांसोबत बसलेल्या आहेत. त्यांच्या सुमधुर आवाजात त्या गाणं गुणगुणत असून सगळे त्यांच्या गाण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. त्यांनी साडीवर करड्या रंगाची शाल घेतली असून निळ्या रंगाची ओढणी घेतली  आहे. त्यांचा साधेपणा आणि सुमधुर आवाज ऐकल्यावर नेटकरी या  फिदा त्यांच्यावर झाले आहेत.

नीना यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या ‘यात्रा’ या (१९८६) मिनी सीरिजचा आहे. त्यांनी या व्हिडीओत  एक पंजाबी लोकगीत गायले आहे. या गाण्यातून गायिका तिच्या प्रियकराला  साद  घालत आहे. ती त्याला विचारते की तु रात्रभर कुठे गेला होतास. ती तिच्या प्रियकराला चान या नावाने संबोधत आहे.

नीना गुप्ता यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘दैल १००’या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहेत. यातील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती सुद्धा मिळताना दिसत आहे. दरम्यान नीना गुप्ता यांनी त्यांच आत्मचरित्र ”सच कहूं तो’ प्रकाशित केलं असून या पुस्तकात नीना गुप्ता यांनी अनेक खासगी गोष्टींचे खुलासे केले आहेत.