गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे त्यांचा रोका झाल्याचे ही सांगण्यात येत आहे. तसेच येत्या डिसेंबरमध्ये ते दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. सध्या त्यांच्या लग्नाची तयारीची धुमाधाम सुरु असल्याचे बोललं जात आहे. दरम्यान ते दोघे नक्की लग्न करणार आहे की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र विकी आणि कतरिनाच्या लग्नावर त्याची पूर्वाश्रमीची गर्लफ्रेंड हरलीन सेठी हिने मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे.
विकी कौशल हा कतरिना डेट करण्यापूर्वी तो हरलीन सेठीला डेट करत असल्याचे बोललं जात आहे. पण काही कारणात्सव त्या दोघांचे ब्रेकअप झाले. दरम्यान विकी आणि कतरिनाच्या लग्नाच्या चर्चांवर हरलीनला विचारले असता ती म्हणाली, “माझ्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडने रिलेशनशिपमध्ये असताना क्षणोक्षणी रंग बदलले आहेत. त्यामुळेच आमचा ब्रेकअप झाला,” असे तिने सांगितले. तिने ‘ई टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकी आणि हरलीनाचा ब्रेकअप हा ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ आणि ‘संजू’ या चित्रपटाच्या यशानंतर झाला. मात्र आता त्यांच्या ब्रेकअपमुळे हरलीनला कोणताही फरक पडत नाही.
हरलीन सेठी आणि विकी कौशल यांच्या एका कॉमन मित्राला याबाबत विचारले असता तो म्हणाला, हरलीन आता या सर्वांपासून फार पुढे निघून आली आहे. ती सध्या कामात व्यस्त आहे. सध्या ती एकता कपूरच्या ‘द टेस्ट केस 2’ या चित्रपटात कामात व्यस्त आहे. नुकतंच तिने या चित्रपटासाठी एक गाणेही शूट केले आहे. जेव्हा आम्ही मित्र हरलीनला कतरिना आणि विकीच्या प्रेमप्रकरणाबद्दल तसेच लग्नाबद्दल विचारतो, तेव्हा ती आम्हाला थांबवते आणि “मला त्या झोनमध्ये पुन्हा घेऊ नका,” असे ती म्हणते.
लग्नानंतर विकी आणि कतरिना राहणार भाड्याच्या घरात…महिन्याचे भाडे ऐकून फुटेल घाम!
हरलीन सेठी ही एक ट्रेंड डान्सर आहे. तिने २०१३ मधील कंट्री ऑफ बॉडीज: बॉम्बे इन डान्स या हॉलिवूड चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी Danceworx Performing Arts Academy यातून ती डान्स करायची. तिने इंडिया अॅडवेंचर्स हा शो देखील होस्ट केला होता. त्यासोबत अनेक ब्रँडच्या जाहिरातीतही ती झळकली होती. विशेष म्हणजे २०१९ मध्ये तेरी होगईया या गाण्याची गायिका म्हणून तिने डेब्यू केला होता.