आठवडाभराचे दगदगीचे आयुष्य आणि काम यातून उसंत मिळणारे दिवस म्हणजे ‘वीकेंड’. रोजच्या रुटीनमधून बाहेर पडून कुठेतरी निवांत वेळ घालवावा आणि मनसोक्त भटकंती करायला मिळावी, यासाठी प्रत्येकाचेच काही खास ठिकाणं असतात. पण अभिनेत्री विद्या बालनचं आवडीचं ठिकाण ऐकून तुम्ही हैराण व्हाल. वीकेंड एन्जॉय करण्यासाठी विद्या बालनचं आवडीचं ठिकाण एक रेस्तरॉं असेल किंवा हिल स्टेशन असेल, असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही चुकीचे आहात. विद्या बालन हँग आउट करण्यासाठीचं आवडतं ठिकाण यापैकी कोणतंही नसून तिच्या घरी असलेलं ‘कपाट’ होय.
अभिनेत्री विद्या बालन वीकेंड एन्जॉय करण्यासाठी परदेशी जात नाही किंवा कोणत्या फार्म हाऊसवर जात नाही. तिच्या घरी असलेल्या कपाटाजवळच तिला मोठी विश्रांती मिळते. अभिनेत्री विद्या बालनने नुकतंच तिच्या घरातील कपाटाच्या आरशासमोर पिवळ्या शर्टमध्ये पोज देत फोटोज क्लिक करून ते इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. हा फोटो शेअर करताना तिने एक कॅप्शन देखील लिहिलीय. “आवडता वीकेंड हँगआउट: माझं कपाट.” हा फोटो शेअर करताना तिने यलो हार्ट इमोजी देखील जोडलीय.
अभिनेत्री विद्या बालनने शेअर केलेल्या या फोटोमध्ये शर्ट आणि पॅंटमध्ये बोल्ड पोज देताना खूपच ग्लॅमरस दिसतेय. विद्या बालनने ज्या प्रकारे स्वतःला पिवळ्या रंगाच्या शर्टमध्ये आणि अॅक्सेसरीजमध्ये सजवून कपाटाच्या बाजूला वेगवेगळ्या पोज देत फोटो क्लिक केले आहेत, ते पाहता तिला तिच्या कपाटावर किती प्रेम आहे, याची प्रचिती येते. कॅमेऱ्यासमोर तिच्या चेहऱ्यावरील वेगवेगळ्या हावभाव पाहून फॅन्स पुरते घायाळ झाले आहेत. मजेदार एक्सप्रेशन्सनी भरलेल्या फोटोंची एक सीरिजच तिने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. “जेव्हा तुम्ही शूटिंग पूर्ण करता, पण तुमच्या टीमला आणखी काही शॉट्स हवे असतात.” असं देखील तिने या फोटोसोबत लिहिलंय.
विद्या बालन तिच्या प्रत्येक वस्तूची निवड तिच्या आवडीनुसार करत असते. मग ती तिच्या करिअरमध्ये असो किंवा तिच्या कपड्यांबाबत. विद्या बालनचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षावर करण्यात येतोय. या फोटोतील विद्या बालनचा लूक मनमोहक दिसून येतोय. फक्त फॅन्सच नव्हे तर सेलिब्रिटींनी सुद्धा तिच्या या फोटोंवर कमेंट करत तिच्या सौंदर्याचं कौतुक केलंय. अभिनेत्री मॉडेल ईशा अग्रवाल हिने ‘सुंदर’ अशी कमेंट केलीय.
विद्या बालन ही धकाधकीच्या वेळेत विश्रांती घेण्यासाठी तिच्याच खोलीत असलेल्या कपाटावरील आरशासमोर जाऊन वीकेंड एन्जॉय करते.
‘इश्किया’, ‘द डर्ट्री पिक्चर’, ‘कहानी’, ‘सुलू’, ‘बेगमजान’, ‘मिशन मंगल’, ‘शकुंतलादेवी’ या चित्रपटानंतर कलाविश्वामध्ये अभिनेत्री विद्या बालन हिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटात विद्याचा अभिनय पाहून सर्वजण थक्क झाले. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर झिरो फिगर या संकल्पनेला छेद देण्यास विद्या यशस्वी ठरली. त्यामुळे आज लोकप्रिय आणि आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये विद्याचा आवर्जुन नाव घेतं जातं.