‘लाइगर’च्या पोस्टरवर विजय देवरकोंडाचा न्यूड फोटो, सारा अली खानची कमेंट चर्चेत

विजय देवरकोंडाच्या ‘लाइगर’चं नवं पोस्टर सोशल मीडियावर चर्चेत आहे.

vijay devarkonda, liger, ananya panday, sara ali khan, vijay devarkonda nude look, liger new poster, विजय देवरकोंडा, अनन्या पांडे, सारा अली खान, लाइगर, माइक टायसन
अभिनेत्री सारा अली खानही यावर प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही.

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा मागच्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी चित्रपट ‘लाइगर’मुळे सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटातून विजय देवरकोंडा बॉलिवूड पदार्पण करणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रदर्शित झालं. हे पोस्टर पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विजय देवरकोंडानं हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर चाहत्यासोबत अभिनेत्री सारा अली खानही यावर प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही.

विजय देवरकोंडानं त्याच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर ते बरंच व्हायरल झालं आहे. या पोस्टरवर तो न्यूड असून हातात गुलाबाच्या फुलांचा बुके पकडून पोज देताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना त्याने लिहिलं, “एक असा चित्रपट ज्याला मी माझं सर्वकाही दिलं. चित्रपटातील भूमिका मानसिक आणि शारीरिकरित्या खूपच आव्हानात्मक ठरली. या भूमिकेसाठी मी माझे पूर्ण प्रयत्न केले आहेत. लवकरच येतोय.”

आणखी वाचा- “मी सलमानला घाबरत…” जेव्हा अर्पिता खानशी ब्रेकअपवर अर्जुन कपूरनं दिलं होतं स्पष्टीकरण

विजय देवरकोंडाच्या या पोस्टरवर अभिनेत्री सारा अली खाननं देखील कमेंट केली आहे. सारानं तिच्या इन्स्टाग्रामवर ‘लाइगर’चं नवं पोस्टर शेअर केलं आहे. हे पोस्टर शेअर करताना सारानं लिहिलं, “रोझेस आर रेड, वायोलेट्स आर ब्लू अँड हियर इज विजय देवरकोंडा लूकिंग स्मोकिंग फॉर यू (आणि माझ्यासाठी सुद्धा)” सारानं विजय देवरकोंडासाठी या पोस्टमध्ये छोटीशी कविताच लिहिली आहे. विशेष म्हणजे विजयने देखील साराच्या या पोस्टवर कमेंट करत तिचे आभार मानले आहेत.

दरम्यान विजय देवरकोंडासोबत या चित्रपटात अनन्या पांडे, मकरंद देशपांडे आणि माइक टायसन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटात विजय देवरकोंडा एका मार्शल आर्ट फाइटरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरनं केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vijay devarkonda nude look in liger new poster sara ali khan comment on it mrj

Next Story
“जर अनिरुद्ध सुधारलेला असेल तर…”, ‘आई कुठे काय करते’मधील मिलिंद गवळींची खास पोस्ट
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी