Kingdom Box Office Collection Day 1: विजय देवरकोंडाचा बहुप्रतिक्षीत ‘किंगडम’ चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट ३१ जुलै रोजी जगभरात प्रदर्शित झाला. विजयच्या ‘किंगडम’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली, ते जाणून घेऊयात.
विजय देवरकोंडाच्या मागील चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खूपच निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे अभिनेत्यासाठी ‘किंगडम’ हा अतिशय महत्त्वाचा चित्रपट होता. रिलीज होण्यापूर्वीच चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. ‘किंगडम’ला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाचे खूप कौतुक केले जात आहे. ‘किंगडम’मधून विजय देवरकोंडाने दमदार पुनरागमन केले आहे, असं चाहते म्हणत आहेत.
सॅकनिल्कच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, विजय देवरकोंडाच्या ‘किंगडम’ने १५.७५ कोटी रुपये कमवून दमदार ओपनिंग केली आहे. हा चित्रपट वीकेंडला किती कमाई करतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. ‘किंगडम’मध्ये मराठमोळी भाग्यश्री बोरसे, सत्य देव व अयप्पा पी शर्मा या कलाकारांच्याही भूमिका आहेत.
Entertainment News Updates : मनोरंजन लाईव्ह अपडेट
ठरलं! प्राजक्ता गायकवाडने दिली आनंदाची बातमी, लवकरच लग्नबंधनात अडकणार; म्हणाली, “प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील…”
“आत्महत्येचे विचार यायचे,” युजवेंद्र चहलने अखेर घटस्फोटाबद्दल सोडलं मौन; धनश्री वर्माबरोबर नेमकं काय बिनसलं? म्हणाला…
अभिनेत्री भाग्यश्री मोटे मोडलेल्या साखरपुड्याबद्दल पहिल्यांदाच झाली व्यक्त, म्हणाली…
विजय देवरकोंडाच्या फ्लॉपचं ग्रहण 'किंगडम'मुळे दूर होणार? (फोटो- इन्स्टाग्राम)