"तो माझ्यापेक्षा वयाने..." ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य | Vijay Hazare Trophy Ruturaj Gaikwad rumored girlfriend sayali sanjeev talk about relationship nrp 97 | Loksatta

“तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य

मात्र काही महिन्यांपूर्वी सायली संजीवने यावर मौन सोडत रिलेशनशिपबद्दल भाष्य केले होते.

“तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य
ऋतुराज गायकवाड सायली संजीव

सध्या इंटरनेटवर क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडची चर्चा सुरु आहे. ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने यूपीविरुद्ध १५९ चेंडूत नाबाद २२० धावांची खेळी केली. ज्यामध्ये १० चौकार आणि १६ षटकार लगावले. यात त्याने एकाच षटकात ७ षटकारांसह ४३ धावा केल्या. एका षटकात ७ षटकार मारणारा ऋतुराज गायकवाड हा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर त्याने दुहेरी शतकही झळकावले. ऋतुराज गायकवाडने नवा वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. त्याच्या या खेळीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून ऋतुराज गायकवाड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र काही महिन्यांपूर्वी सायली संजीवने यावर मौन सोडत रिलेशनशिपबद्दल भाष्य केले होते.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सायली संजीवला ओळखले जाते. सायली आणि ऋतुराजच्या अफेअरच्या चर्चा गेल्या आयपीएलपासून रंगल्या आहेत. ऋतुराजने सायलीच्या वनपीस घातलेल्या फोटोवर कमेंट केली होती. त्या कमेंटमुळे या चर्चा सुरु झाल्या होत्या. ऋतुराजने तिच्या त्या फोटोवर वाह अशी कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केले होते. त्यावर सायलीनेही हार्ट इमोजी शेअर करत त्याला रिप्लाय दिला होता. त्यानंतरच त्यांच्या अफेरच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र काही महिन्यांपूर्वी बस बाई बस या कार्यक्रमावेळी सायली संजीवने यावर थेट भाष्य केले होते.
आणखी वाचा : ६,६,६,६,६,६,६ … एका ओव्हरमध्ये ७ षटकार मारत ऋतुराज गायकवाडने रचला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; पाहा व्हिडीओ

‘बस बाई बस’ या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांनी सायलीला ऋतुराजबद्दल प्रश्न विचारला. यावेळी सायलीबरोबर अभिनेता शरद केळकरही सहभागी झाला होता. सायलीला ऋतुराजबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर शरदने तिची थट्टा करण्यास सुरुवात केली. ‘जर तो तुझा मित्र असेल तर प्लीझ मला त्याच्याकडून एक बॅट हवी आहे… माझ्यासाठी एक बॅट मागून घे’ असे तिला त्याने गंमतीत म्हटले. त्यावर तिने ‘मी तुम्हाला बॅट मिळवून देऊ शकते’, असे म्हटले.

त्यानंतर तिने रिलेशनशिपबद्दलच्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर दिले. “मी आणि तो फार चांगले मित्र आहोत. खरं सांगायचं तर आयपीएल खेळणाऱ्यांपैकी दोन-तीन माझे चांगले मित्र आहेत. त्यातील एक रॉयल चॅलेंजर बँगलोर, ऋतुराज चेन्नई सुपरकिंग्ज, तुषार देशपांडे हा पण चेन्नई सुपरकिंग्जमध्ये आहे. पण हे सर्वजण माझे खरंच खूप चांगले मित्र आहेत. त्यांना माझी काही दिया परदेस ही मालिका फार आवडायची. ते ती मालिका बघायचे. मला ही गोष्ट कळल्यानंतर मी जरा चकितच झाले. क्रिकेटपटू ही मालिका का बघतात हेच मला कळत नव्हते. एकतर ते तिघेही माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत”, असे तिने उत्तर यावेळी दिले.

आणखी वाचा : राणादा-पाठकबाईंपाठोपाठ आणखी एका रिल लाइफ जोडीची लगीनघाई, मेहंदीचे फोटो आले समोर

सायलीच्या या उत्तरानंतर त्या दोघांचे रिलेशनशिपमध्ये आहेत की नाही याबद्दल अजूनही चाहत्यांना शंका आहे. पण तिने मात्र यावर टाळाटाळ केली आहे. दरम्यान सायली ही काही दिया परदेस या मालिकेतून घराघरात पोहोचली. तिने आतापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. सौंदर्य आणि उत्तम अभिनयशैली यांच्या जोरावर सायलीने सिनेसृष्टीत तिचे अढळ स्थान निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी ती हर हर महादेव या चित्रपटात ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची भूमिका साकारत होती. त्याबरोबरच तिची प्रमुख भूमिका असलेला गोष्ट एका पैठणीची हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 17:23 IST
Next Story
अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ आता रशियामध्ये झळकणार; या दिवशी चित्रपटातील कलाकार लावणार स्क्रीनिंगसाठी हजेरी