भारतातून ९ हजार कोटींचा घोटाळा करून विदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्याच्या मुलाच्या लग्नाचं वृत्त आता समोर आलं आहे. विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या यानं त्याच्या लग्नासंदर्भात इन्स्टाग्राम पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. लवकरच ते विवाहबद्ध होणार आहेत. त्याच्या विवाहासाठीचे सर्व कार्यक्रम तब्बल एक आठवडा चालणार आहेत. त्याच कार्यक्रमामधले काही फोटो सिद्धार्थ मल्ल्यानं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सिद्धार्थ मल्ल्या सुरुवातीच्या काळात आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा संचालकही होता.

सिद्धार्थ मल्ल्याच्या लग्नाचे कार्यक्रम आठवडाभर चालणार असून त्यातील फोटो त्याने शेअर केले आहेत. या कार्यक्रमांना सुरुवात झाल्यानंतर तेव्हाचा एक फोटो सिद्धार्थनं शेअर करून “लग्नाच्या आठवड्याची सुरुवात झाली”, अशा आशयाची पोस्ट लिहिली आहेत. या पोस्टसोबत त्यानं प्रेयसी जॅस्मिनसोबत एक फोटोही शेअर केला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay mallya son siddharth mallya set to marry long time girlfriend pmw