क्रिकेट आणि बॉलीवूड यांचे जणू काही अतूट नातेचं निर्माण झाले आहे. बॉलीवूड नायिका आणि क्रिकेटच्या मैदानावरील हिरो यांची जोडी जुळणे आता काही नवीन बाब राहिलेली नाही. अशीच एक चर्चित जोडी म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा.
विराट आणि अनुष्काच्या जोडीने अनेकांचे प्रेम मिळवलेले आहे. त्या दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे, बहुदा हे दोघे लवकरचं लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे. हे प्रेमीयुगुल मुंबईत नवे घर शोधत असल्याची चर्चा आहे. पिंकविलामध्ये आलेल्या वृत्तानुसार, वरळी येथे असलेल्या ‘ओमकार १९७३’ या अपार्टमेंटला या दोघांनी भेट दिली होती. अगदी थोड्याच वेळात घराची पाहणी केल्यानंतर हे दोघेही परतताना घर पाहून प्रभावित झालेले दिसले. जर सर्व बोलणी सुरळीत झाली तर या दोघांचे स्वप्नातील घर त्यांना सापडेल.
संग्रहित लेख, दिनांक 24th Oct 2015 रोजी प्रकाशित
विराट-अनुष्काचे स्वप्नातील घर ‘ओमकार १९७३’
बॉलीवूड नायिका आणि क्रिकेटच्या मैदानावरील हिरो यांची जोडी जुळणे आता काही नवीन बाब राहिलेली नाही.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 24-10-2015 at 12:54 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli and lady love anushka sharma buying their dream home in worli