Watch This South Crime Thriller Film : South Crime Thriller Movie : घरी बसून रिकाम्या वेळेत ओटीटीवर चित्रपट पाहण्याची अनेकांना आवड असते. त्यात जर तुम्हाला अशावेळी क्राइम, रहस्यमय आणि थ्रिलर जॉनरची आवड असेल तर आम्ही तुम्हाला अशाच एका दाक्षिणात्य चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील. हा एक रहस्यमय आणि क्राइम थ्रिलर चित्रपट आहे; चला तर जाणून घेऊ या चित्रपटाबद्दल.
आम्ही ज्या क्राइम, थ्रिलर चित्रपटाबद्दल बोलत आहोत तो चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला. या चित्रपटाचं दिग्दर्शन श्री गणेश यांनी केलं आहे आणि या चित्रपटात अभिनेता वेट्री, अपर्णा बालमुरली, नासर, एमएस भास्कर आणि मीरा मिथुन यांच्यासह इतर अनेक दाक्षिणात्य कलाकार पाहायला मिळतात. या क्राइम थ्रिलर चित्रपटाचं नाव ‘८ थोट्टक्कल’ असं आहे आणि हा एक तामिळ चित्रपट असून हिंदी भाषेतही डब झाला आहे. चला तर जाणून घेऊ नक्की या चित्रपटाची कथा काय आहे.
काय आहे ‘८ थोट्टक्कल’ची कथा
२ तास ५५ मिनिटांच्या या चित्रपटाची कथा नेमकी काय आहे जाणून घेऊ. या चित्रपटाची कथा सत्या (वेट्री) या प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याच्या भोवती फिरते, ज्याला लोक त्याच्या साधेपणामुळे कमजोर समजतात. एक दिवस त्याची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर अचानक हरवते, ज्यामध्ये ८ गोळ्या असतात. त्यानंतर त्या रिव्हॉल्व्हरचा वापर करून एका बँकेमध्ये चोरी केली जाते, ज्यात अनेक निरपराध लोकांचे प्राण जातात.
यानंतर पुढे सत्याला सस्पेंड केलं जातं. सस्पेंड झाल्यानंतर तो स्वत:च या प्रकरणाचा तपास करतो, जिथे त्याला समजतं की त्याची रिव्हॉल्व्हर त्याच्या ओळखीतल्याच कोणीतरी गायब केली आहे. शोधादरम्यान तो निवृत्त पोलिस ऑफिसर एम एस भास्कर यांच्या संपर्कात येतो आणि याचवेळी कथानकाला मोठं वळण येतं, जे पाहून तुम्ही हैराण व्हाल.
ओटीटीवर कुठे पाहाल हा चित्रपट?
रहस्यमय, क्राइम थ्रिलर कथानक असलेला हा चित्रपट तुम्ही ओटीटीवर पाहू शकता. ‘८ थोट्टक्कल’ हा चित्रपट तुम्ही ओटीटीवर ‘जिओ ह़ॉटस्टार’वर पाहू शकता आणि ‘झी ५वर’ही हा चित्रपट पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
