“बाहेर जा…”; अन् ऐश्वर्याने अभिषेकला काढले बेडरुम बाहेर

ऐश्वर्याने अभिषेकला सलग दोन दिवस बेडरुमच्या बाहेर काढले.

विश्व सुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि पती अभिषेक बच्चन यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. या दोघांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली असली तरी त्याच्यातील प्रेम अद्याप कायम आहे. या दोघांना अनेकजण आदर्श कपल समजतात. मात्र एकदा ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात जोराचे भांडण झाले होते. यामुळे ऐश्वर्याने अभिषेकला सलग दोन दिवस बेडरुमच्या बाहेर काढले. त्यामुळे अभिषेकला हॉलमध्ये त्याच्या दोन्ही रात्री घालवाव्या लागल्या होत्या.

अभिषेक आणि ऐश्वर्याचा हा किस्सा २०१४ चा आहे. २०१४ मध्ये अभिषेक हा आपल्या कबड्डी संघाच्या प्रशिक्षणाच्या संदर्भात चेन्नईच्या सत्यभामा विद्यापीठात गेला होता. त्यावेळी त्याची ओळख त्या ठिकाणच्या विद्यापीठाचे संस्थापक कर्नल जेपिआर यांच्याशी झाली. ते अभिषेकला त्याच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. त्याचे ऑफिस फार लहान होते. त्यात दोन-चार खुर्च्यांशिवाय एक डेस्क होता. त्याव्यतिरिक्त त्याच्या ऑफिसमध्ये काहीही नव्हते.

त्यावेळी त्यांनी त्यांना मिळालेल्या सर्व ट्रॉफी या जमिनीवर ठेवल्या होत्या. हे पाहून अभिषेकला आश्चर्य वाटले. “तुम्ही या सर्व ट्रॉफी जमिनीवर का ठेवलात?” असा प्रश्न अभिषेकने कर्नल जेपिआर यांना विचारला होता. तेव्हा ते म्हणाले, “मी या सर्व ट्रॉफी जमिनीवर ठेवण्यामागचे कारण म्हणजे हे पुरस्कार जिंकलेल्या विजयाची नशा माझ्या डोक्यात जाऊ नये,” असे त्यांनी सांगितले. कर्नलची ही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर अभिषेक हा भारावून गेला.

यानंतर चेन्नईतून मुंबईत आल्यावर अभिषेकने आपल्या घरीही हेच करावं असा विचार केला. त्यानंतर त्याने त्याच्या घरातील बेडरुममध्ये ऐश्वर्याच्या सर्व ट्रॉफी जमिनीवर ठेवल्या. यामुळे संपूर्ण बेडरुम ट्रॉफीने भरुन गेले. हा सर्व प्रकार पाहिल्यावर ऐश्वर्या मात्र खूप भडकली.

यानंतर तिने मला असं करण्याचे कारण विचारले. त्यावेळी मी तिला घडलेला सर्व प्रकार सांगितला. मी ऐश्वर्याला जमिनीवर ट्रॉफी ठेवण्याचे कारणही सांगितले. पण ती इतकी चिडली होती की तिने मला सरळ खोलीबाहेर जा, असे सांगितले. ऐश्वर्याच्या या रागामुळे मला दोन रात्री बेडरुमच्या बाहेर काढाव्या लागल्या. त्या काळात मी हॉलमध्ये झोपायचो, असा किस्सा अभिषेकने सांगितला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: When aishwarya rai told abhishek bachchan to sleep outside bedroom nrp

Next Story
स.पां.देशपांडे
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी