बॉलिवूडमध्ये दोन मोठ्या कलाकारांमध्ये असलेल्या वाद काही नवीन नाहीत पण या वादाच रुपांतर हे कोणाला कानशिलात लगावली असे आपण फारसे ऐकलं नाही. परंतु शेवटी कानशिलात लगावली अशी एक घटना अभिनेत्री अमृता राव आणि इशा देओल यांच्यामध्ये घडली होती.
अमृता आणि इशा देओल यांनी २००६मध्ये ‘प्यारे मोहन’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या दोघी अभिनेत्रींनी चित्रपटांमध्ये लाजाळू आणि शांत मुलींची भूमिका साकारली आहे. अमृताने एका चित्रपटाच्या सेटवर इशावर काही कमेंट्स केल्या होत्या आणि त्यानंतर इशाने अमृताला कानशिलात लगावली होती.
इशाने ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत इशाने त्यांच्यात झालेल्या वादाची पुष्टी केली आहे. “हो मी अमृताला कानशिलात लगावली होती. एक दिवस पॅक-अप नंतर, तिने माझे दिग्दर्शक इंद्र कुमार आणि कॅमेरामनसमोर मला शिवीगाळ केली आणि ते चुकीचे असल्याचे मला वाटले. तेव्हा माझ्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी, मी तिला कानशिलात लगावली होती. मी तिला कानशिलात लगावली याबद्दल मला वाईट वाटत नाही कारण त्यावेळी तिने जे केलं ते चुकीचे होते. मी फक्त माझ्या सन्मानासाठी ते केले,” असे इशा म्हणाली.
आणखी वाचा : जेनेलियासोबत वेळ घालवत असलेल्या रितेशला जेव्हा कळाले की…
पुढे इशा म्हणाली, “तिला तिची चुक समजली, तिने माझी माफी देखील मागितली आणि मी तिला माफ देखील केलं आहे. आता आमच्यात सगळ्या गोष्टी ठीक आहेत.”