आमिरच्या 'गजनी'मुळे हॉलिवूडचा हा दिग्दर्शक चांगलाच अस्वस्थ झाला होता; अनिल कपूरने सांगितला किस्सा | when hollywood director christopher nolan got upset because of aamir khan starrer ghajini | Loksatta

आमिरच्या ‘गजनी’मुळे हॉलिवूडचा ‘हा’ दिग्दर्शक चांगलाच अस्वस्थ झाला होता; अनिल कपूरने सांगितला किस्सा

गजनी हा १०० कोटी कमाई करणारा पहिला हिंदी चित्रपट होता.

आमिरच्या ‘गजनी’मुळे हॉलिवूडचा ‘हा’ दिग्दर्शक चांगलाच अस्वस्थ झाला होता; अनिल कपूरने सांगितला किस्सा
गजनी चित्रपट | ghajini movie

आमिर खानचा ‘गजनी’ आजही आपल्याला चांगलाच लक्षात आहे. शॉर्ट टर्म मेमरी लॉस या आजारावर बेतलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर लॉन्ग टर्म गारुड केलं होतं. खुद्द आमिर याच्या प्रमोशनसाठी रस्त्यावर उतरून लोकांना खास गजनी स्टाइल हेअर कट देत होता. तेव्हा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. मात्र या चित्रपटामुळे हॉलिवूडचा एक प्रसिद्ध दिग्दर्शक मात्र चांगलाच अस्वस्थ होता. आज तोच किस्सा जाणून घेणार आहोत.

२००५ साली मुर्गदास यांनी असिन आणि सुरिया यांना घेऊन तामीळ भाषेत ‘गजनी’काढला. जो प्रचंड गाजला आणि लोकांनी डोक्यावर घेतला. यानंतर २००८ मध्ये आमिर खानला घेऊन मुर्गदास यांनी ‘गजनी’चा हिंदी रिमेक केला आणि त्यालाही उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. इतकंच नाही १०० कोटी इतकी कमाई करणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला.

आणखी वाचा : “मीदेखील पठाणची वाट पाहतोय” असं म्हणत हटके स्टाईलमध्ये शाहरुखने शेअर केला खास ‘पठाण’लूक

आमिरचं सगळेच कौतुक करत होते, पण हॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक क्रिस्तोफर नोलन हा मात्र या चित्रपटामुळे चांगलाच अस्वस्थ होता. गजनी हा चित्रपट २००० साली हॉलिवूडमध्ये बनलेल्या नोलनच्या ‘मेमेंटो’ या चित्रपटाशी साधर्म्य साधणारा होता आणि नोलनला याबद्दल माहिती होती. बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर हे मध्यंतरी नोलनला भेटले असताना त्यांच्यात ‘गजनी’वरुन चर्चा झाली.

अनिल कपूर यांनी तो किस्सा आमिरलाही सांगितला. अनिल नोलनशी बोलत असताना नोलनने गजनीचा उल्लेख केला आणि तो चित्रपट मेमेंटोची कॉपी असल्याचंही त्याच्या कानावर आलं होतं. “चित्रपटाला एवढं यश मिळूनही माझा कुठेच उल्लेख नाही किंवा पैसेदेखील दिले नाहीत.” असं म्हणत नोलनने खेद व्यक्त केल्याचं अनिल कपूर यांनी सांगितलं.

यामुळे नोलन प्रचंड अस्वस्थ होता. ‘मेमेंटो’ हा त्याचा पहिला व्यावसायिक हिट चित्रपट होता. आपल्या भावाच्या लघुकथेवर नोलनने या चित्रपटाची कथा लिहिली होती. हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी प्रथम कुणीच पुढे येत नव्हतं. अखेर चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्वतःच हा चित्रपट प्रदर्शित करण्याचं ठरवलं आणि २००० साली हा चित्रपट केवळ ११ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्यानंतर पुढे या चित्रपटाने इतिहास रचला.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“मी निवडणूक लढवण्याबद्दलची घोषणा मोदीजी करणार होते पण हेमा मालिनींनी…”, राखी सावंतची खोचक प्रतिक्रिया

संबंधित बातम्या

‘द काश्मीर फाइल्स’ला ‘व्हल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’ म्हणणाऱ्या लॅपिड यांनी मागितली माफी; म्हणाले, “काश्मिरी पंडितांचा…”
“आरडाओरड करणाऱ्या लोकांमध्ये तो कायम…” रवीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर मराठी लेखकाची तिरकस पोस्ट
“मी खरा आहे कारण…” मानसी नाईकच्या नवऱ्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत
हॉलिवूडमधील महागडा घटस्फोट! अभिनेत्री किम कार्दशियनला कान्ये वेस्ट महिन्याला देणार तब्बल ‘इतके’ कोटी रुपये
नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल

व्हिडिओ

ताज्या बातम्या
रायगडमध्ये भात लागवडक्षेत्रात घट; तांदूळ उत्पादनात मात्र वाढ, प्रति हेक्टरी अडीच टन धान्य
शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ ; प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त विभागाकडे
अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे क्रिकेट सल्लागार समितीवर
महानगर क्षेत्रात लवकरच आपला दवाखाना ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
FIFA World Cup 2022: टय़ुनिशियाविरुद्ध अपात्र गोलबाबत फ्रान्स फुटबॉल महासंघाची तक्रार