When Rekha Explained The Definition of True Love : रेखा या बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. ९०च्या काळात त्यांनी त्यांच्या सौंदर्याने व सुंदर अभिनयाने अनेकांच्या मनात घर केलं. आजही रेखा यांची क्रेझ कायम आहे. रेखा व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असायच्या. अभिनेत्री रेखा व अभिनेते अमिताभ बच्चन एकेकाळी नात्यात होते. दोघांच्या लव्ह स्टोरीची खूप चर्चा झाली होती. या दोघांच्या लव्ह स्टोरीशी संबंधित अनेक किस्से अजूनही चर्चेत असतात.
रेखा यांनी कपिल शर्माच्या शोमध्ये खऱ्या प्रेमाबद्दलचे त्यांचे विचार मांडले होते. कपिल शर्मा आणि त्याच्या टीमशी झालेल्या संभाषणादरम्यान, रेखा यांनी प्रेमाबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन मांडला आणि स्पष्ट केले की खरे प्रेम फक्त एकदाच होते, जर तुम्हाला योग्य जोडीदार भेटला तर.
कपिल शोमध्ये रेखा म्हणालेल्या, “जर योग्य माणूस असेल तर प्रेम फक्त एकदाच होते. किती वेळा, किती लोकांबरोबर प्रेम करायचं? त्यांनी ते विनोदी पद्धतीने मांडले होते, ज्यामुळे प्रेक्षक हसू लागले.
रेखा नंतर स्वतःवर प्रेम करण्याबद्दल बोलल्या होत्या. त्या म्हणाल्या, “माझा अनुभव असा आहे… मी स्वतःबद्दल बोलू शकते… सर्वप्रथम, मला सर्वकाही आवडते. काम, माझे मित्र, जग, निसर्ग… पण सर्वात जास्त, मी स्वतःवर प्रेम करते.”
रेखा यांनी प्रेमाबद्दल उघडपणे बोलण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. लोकप्रिय टॉक शो Rendezvous with Simi Garewal मध्ये त्यांनी सिमी गरेवालबरोबर असाच संवाद साधला होता. त्या संवादादरम्यान रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दलच्या त्यांच्या भावना उघडपणे व्यक्त केल्या होत्या. या खास चॅट शोमध्ये सिमी यांनी रेखा यांना थेट अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम आहे का? असा प्रश्न केला होता. या प्रश्नाचं रेखा यांनी उत्तर दिलं होतं. “अर्थात, आजपर्यंत मला एकही पुरुष, स्त्री, लहान मूल किंवा वृद्ध माणूस सापडला नाही जो त्यांच्यावर वेड्यासारखं प्रेम करत नाही, मग माझं प्रेम कसं नसेल?” असं रेखा म्हणाल्या होत्या.
रेखा यांची उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यामुळे त्या नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यांच्या चित्रपटांची लोक आतुरतेने वाट पाहायचे. सध्या त्या चित्रपटांमध्ये सक्रिय नसल्या तरी कायम प्रकाशझोतात असतात. रेखा यांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि साऊथपासून बॉलीवूडपर्यंत त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम केले आहे.