उद्योगपती संजय कपूरच्या निधनानंतर केवळ व्यावसायिक जगातच नव्हे तर बॉलीवूड आणि फॅशन इंडस्ट्रीमध्येही शोककळा पसरली आहे. संजय कपूरचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे.
फार कमी लोकांना माहिती आहे की, करीश्मा कपूर आणि प्रिया सचदेव यांच्या आधी संजयचे पहिले लग्न फॅशन डिझायनर आणि समाजसेविका नंदिता महतानीशी झाले होते. नंदिता महतानी केवळ एका व्यावसायिक कुटुंबातून येत नाहीत तर तिचे बॉलीवूड आणि क्रिकेटशीही संबंध आहेत.
नंदिता आणि संजय कपूरचे लग्न १९९६ मध्ये झाले. त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि चार वर्षांतच २००० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. नंदिता दिल्लीतील एका प्रभावशाली व्यावसायिक कुटुंबातील आहे. तिचा भाऊ भरत महतानी आणि बहीण अनु हिंदुजा हे देखील सामाजिक वर्तुळात खूप सक्रिय आहेत. नंदिताच्या कुटुंबातील लग्नांमध्ये बॉलीवूडमधील मोठे स्टार उपस्थित राहिले आहेत, यावरून तिचे नेटवर्क किती मोठे आहे याची कल्पना येते.
नंदिता महतानीचे नाव वेळोवेळी अनेक मोठ्या स्टार्सशी जोडले गेले आहे. तिने केवळ डिनो मोरियाला डेट केले नाही तर त्याच्याबरोबर ‘प्लेग्राउंड’ नावाचा फॅशन ब्रँडही चालवला. त्याच वेळी, एक काळ असा होता जेव्हा तिचे नाव रणबीर कपूरशी जोडले गेले. एका मुलाखतीत रणबीरने नंदितावर क्रश असल्याचा खुलासाही केला होता. मात्र, दोघांनी कधीच रिलेशनशिप कन्फर्म केलं नाही. २०१७ मध्ये ‘द क्विंट’शी झालेल्या संभाषणात अभिनेत्याने सांगितले की, त्याच्या आईलाही माहीत होते की त्याला नंदितावर क्रश होते.
नंदिना महतानी आणि विद्युत जामवाल यांचं अफेअर होतं. २०२१ मध्ये विद्युतने रिलेशनशिप कन्फर्मही केलं होतं. त्यांचं लग्नाचंही प्लॅनिंग होतं. मात्र नंतर त्यांचं नातं तुटलं.
नंदिता ही फक्त बॉलीवूडपुरती मर्यादित नाही तर भारतीय क्रिकेट जगतातील सर्वात मोठे नाव असलेल्या विराट कोहलीची स्टायलिस्ट राहिली आहे. नंदिताने अनेक सेलिब्रिटींना स्टाईल केलं आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहलीचीही ती स्टायलिस्ट राहिली आहे. विराटचे अनेक फोटो तिच्या सोशल मीडियावर आहेत. २०१९ साली तिने विराट कोहलीच्या फॅशन सेन्सचं कौतुक केलं होतं.
करीश्मा कपूरचा पूर्वाश्रमीचा पती संजय कपूरचे १२ जूनच्या रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. संजय कपूर ५३ वर्षांचा होता. संजय कपूर आणि करीष्मा कपूर यांनी २००३ मध्ये लग्न केलेलं. पण, लग्नाच्या १३ वर्षांनी २०१६ मध्ये दोघांनीही नात्याचा दी एन्ड करण्याचा निर्णय घेतला. दोघांनाही दोन मुलं आहेत.