यूट्यूबर प्राजक्ता कोळी ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. तिच्या सगळ्याच पोस्ट नेटकऱ्यांना आवडतात. ती वेगवेगळ्या व्हिडीओतुन ती नेटकऱ्यांचे मनोरंजन करत असते. नेटफ्लिक्सवरच्या ‘मिसमॅच्ड’या वेब सीरिजमधून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ‘मिसमॅच्ड’ ही एक रोम-कॉम सीरिज असून याचा पहिला सिझन २० नोव्हेंबरला नेटफि्लक्सवर प्रदर्शित झाला होता. यात प्राजक्ता डिम्पल अहुजाची भूमिका साकारत आहे तर रोहित सराफ ऋषी सक्सेनाची. ही नवीन जोडी प्रेक्षकांना बघता क्षणीच आवडली होती; आता सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत ती तिच्या दुसऱ्या सिझनची. अशात प्राजक्ताची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. यात प्राजक्ताने आगामी सिझनची हिंट दिली आहे.
प्राजक्ता चांगलं कंटेंट तयार करून तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. मात्र काही दिवसांपूर्वी तिने शेअर केलेलं रील सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. या रीलमध्ये तिचे ‘मिसमॅच्ड’ सिझन २ साठी प्राजक्ताचे डिम्पल अहुजामध्ये रूपांतर कसे होत, ते दाखवण्यात आले आहे. पूर्ण दोन वर्षांनी प्राजक्ता पुन्हा डिम्पलची भूमिका साकारणार असल्याचे तिने त्या रीलमध्ये सांगितले आहे. ती यासाठी प्रचंड उत्सुक असल्याचे दिसत आहे. ही रील शेअर करत तिने ‘मिसमॅच्ड’सिझन २ असे कॅप्शन दिले आहे. हे रील नेटफ्लिक्स इंडियाने देखील शेअर केले आहे.
प्राजक्ताने शेअर केलेले रील पाहून आता नेटकरी त्या पोस्टवर कमेंट आणि लाईक्स करुन त्यांचा आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. ‘मिसमॅच्ड’ हा नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय शो असून प्राजक्ता कोळीची ही डेब्यू वेब सीरिज आहे. या वेब सीरिजचा दुसरा सिझन वर्षा अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार, अशा चर्चा रंगू लागल्या होत्या आणि आता प्राजक्ताने शेअर केलेल्या या रीलमुळे नेटकऱ्यांची उत्कंठा वाढली आहे. यात प्राजक्ता आणि रोहित बरोबरच कृतिका भारद्वाज, मुस्कान जाफरी , विद्या मालवडे, तारूक रैना, निधी सिंग हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.