अभिनेत्री झरीन खानच्या आईच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यानं त्यांना ताबडतोब रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. गेल्या दीड महिन्यांपासून त्या आजारी आहेत. काल अचानक त्यांची तब्बेत खालावल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करावं लागंल. त्यानंतर अभिनेत्री झरीन खानने तिच्या आईसाठी प्रार्थना करण्याचं आवाहान फॅन्सकडे केलंय.

अभिनेत्री झरीन खानने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलं, “मला माहितेय मला थोडा उशिर झालाय, पण माझ्या वाढदिवसाच्या आणि ईदच्या शुभेच्छा दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार…मला त्याच वेळी वैयक्तिकरित्या तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करणं जमलं नाही…गेल्या दीड महिन्यांपासून माझी आई आजारी असल्यामुळे तिची फार काळजी वाटत होती…सध्या त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्या लवकरात लवकर बऱ्या होवोत यासाठी तुम्ही सर्वांनी कृपया देवाकडे प्रार्थना करा.”

अभिनेत्री झरीन खान लवकरच तिच्या आगामी पंजाबी फिल्म ‘पटाके पाएंगे’ मधून झळकणार आहे. या फिल्मचं दिग्दर्शन समीप कांग यांनी केलं आहे. या व्यतिरिक्त ती अरमान मलिक आणि नीति मोहन यांच्या म्यूझिक व्हिडीओ ‘प्यार मांगा है’ मध्ये दिसून आली होती. तिच्या काही वेब सीरिज देखील रिलीज होणार आहेत. अभिनेत्री झरीन खान ही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर बरीच सक्रिय असते.