मुंबई : पायधूनी येथील पी. डीमेलो मार्गावरील प्रभु हॉटेल समोरच्या गल्लीतून विनापरवाना व अनधिकृतरीत्या पिस्तुले व जिवंत काडतुसांची विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली. तसेच, त्यांच्याकडून दोन पिस्तूल, एक रिव्हॉलवर, तीन गावठी बनावटीचे सिंगल बोअर कट्टे, दोन रिकाम्या मॅगझीन आणि एकुण ६७ निवंत काडतुसे जप्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई : आज पश्चिम रेल्वेवर, उद्या मध्य रेल्वेवर ब्लॉक

काही संशयित इसम विनापरवाना पिस्तुले व जिवंत काडतुसे घेवुन ते विक्री करण्याच्या उद्देशाने पायधूनी येथे येणार असल्याची माहिती मुंबईतील खंडणी विरोधी कक्षास प्राप्त झाली होती. या माहितीची शहानिशा केल्यानंतर खंडणी विरोधी कक्ष आणि गुन्हे शाखा यांनी ठरलेल्या ठिकाणी सापळा रचला. त्यानंतर, अभिषेककुमार अंजनीकुमार पटेल (२६), सिध्दार्थ सुबोधकुमार सुमन उर्फ गोलु (२३) रचित रामशिषकुमार मंडल उर्फ पुष्पक (२७) या तिघांना रंगेहाथ पकडुन त्यांच्याकडून पिस्तुलांसह ६७ जिवंत काडतुसे जप्त केली. या घटनेबाबत पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, खंडणी विरोधी कक्ष आणि गुन्हे शाखेमार्फत प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 arrested with 6 pistols 67 live cartridges mumbai print news zws zws