मुंबई: हिंदू कॉलनीमधील बहुमजली इमारतीला शनिवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. या दुर्घटनेत एका वृद्धाचा मृत्यू झाला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
दादर पूर्व परिसरातील हिंदू कॉलनीमधील गल्ली क्रमांक २ येथील १५ मजली रेन ट्री इमारतीत शनिवारी सकाळी आग लागली. इमारतीच्या १३ व्या मजल्यावर ही आग लागली होती. आगीमुळे इमारतीत धूर पसरला होता. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.
हेही वाचा… आमदार अपात्रतेची सोमवारपासून सुनावणी; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांनाही नोटीस बजावणार
धुरामुळे इमारतीमधील रहिवासी सचिन पाटकर (६०) गुदमरले. त्यांना तात्काळ शीव रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी पाटकर यांना मृत घोषित केले.
First published on: 23-09-2023 at 11:46 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A fire broke out in a 15 floors building in hindu colony dadar an old man died in this accident mumbai print news dvr