छत्तीसगडमधील २५ वर्षीय प्रशिक्षणार्थी एअर होस्टेसचा मुंबईत निर्घूणपणे खून केला आहे. मुंबईतील एका फ्लॅटमध्ये तिचा गळा चिरून खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी ४० वर्षीय आरोपीला अटक केली आहे. रूपल ओग्रे असं एअर होस्टेसचं नाव आहे. तर, विक्रम अटवाल असं आरोपीचं नाव आहे. आरोपी विक्रम रूपलच्या घराची स्वच्छता करायचा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रूपल ओग्रे ही एप्रिल महिन्यात एअर इंडियामध्ये नोकरीसाठी मुंबईत आली होती. रूपल तिची बहीण आणि बहिणीच्या प्रियकरासह मरोळच्या के. मारवाह रोडवरील एनजी कॉम्प्लेक्स सोसायटीमधील सी-विंग फ्लॅट ३०६ मध्ये राहत होती. मात्र, दोघेही गावी गेल्याने रूपल घरी एकटीच होती.

हीच संधी साधून सफाई कर्मचारी विक्रम अटवाल रविवारी सकाळी अकराच्या सुमारास शौचालय साफ करण्याच्या बहाण्याने रूपलच्या घरी आला. एकटीचा फायदा घेऊन अटवालने रूपलवर जबदरस्ती करण्याचा प्रयत्न केला. यास रूपलनेही जोरदार विरोध केला.

पोलीस अधिकाऱ्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितल्यानुसार, “रूपलला घाबरवण्याच्या उद्देशाने अटवाल चाकू घेऊन आला होता. जबदरस्ती करण्याचा प्रयत्न करताना अटवाल आणि रूपलमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यात रूपल जमिनीवर कोसळली आणि अटवालने तिचा गळा चिरला. यामुळे मोठ्या प्रमाणात तिचा रक्तस्राव झाला. या भांडणात अटवालचा हातही कापला गेला. नंतर अटवालने फरशीची सफाई केली आणि ऑटोलॉकने दरवाजा बंद करून पळून गेला.”

हेही वाचा : महिला पोलीस शिपायाला गुंगीचे औषध देऊन बलात्कार; पोलीस शिपायावर गुन्हा

दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याने म्हटलं, “घरी गेल्यावर पत्नीनं हाताच्या जखमेबद्दल आरोपी विक्रमला विचारणा केली. तेव्हा कामावर अपघात झाल्याचं विक्रमने सांगितलं. यानंतर स्थानिक डॉक्टरांकडे विक्रमने हातावर उपचार केले.”
रविवारी दुपारी रुपलच्या कुटुंबीयांनी तिच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही. याबाबत रूपलच्या मित्रांना माहिती देण्यात आली. तेव्हा, मित्रांनी घराला कुलूप असल्याचं पाहिलं. यानंतर पोलिसांना माहिती दिल्यावर दुसऱ्या चावीने दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी रूपल रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली.

हेही वाचा : पुणे : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी मगरपट्टा पोलीस चौकीतून पसार

यानंतर डीसीपी दत्ता नलावडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. सोसायटीत ४ ते ५ सफाई कर्मचारी आहेत. त्यातील अटवालच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि हाताला दुखापत झाल्याचं समोर आलं. याबाबत पोलिसांनी विचारणा केली असता, उडवा-उडवीची उत्तरे अटवालने दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच अटवालने गुन्हा कबूल केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Airhostess found dead in mumbai flat with her throat slit housekeeper arrested ssa