मुंबई: म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २०१८ च्या सोडतीतील बाळकुममधील गृहप्रकल्पातील घरांच्या किंमतीत थेट १६ लाख रुपयांची वाढ मंडळाने केली आहे. त्या विरोधात लाभार्थ्यांनी सोमवारी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. सरकार आणि म्हाडाविरोधात निदर्शने करत किंमती कमी करण्याची मागणी या विजेते करत आहेत.

हेही वाचा >>> मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीत भाजपा, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची युती कशी? शरद पवार म्हणाले…

हेही वाचा >>> VIDEO : “भाजपाचा नी संवेदनशीलतेचा काय संबंध, त्यांनी माघार घेतली कारण…”; सुषमा अंधारेंची जोरदार टीका

कोकण मंडळाने २०१८ च्या सोडतीतील १२५ घरांसह २००० च्या विशेष योजनेतील ६९ लाभार्थ्यांच्या ६९ घरांच्या किंमतीत १६ लाख रुपयांची वाढ केली आहे. मेट्रो उपकर, व्याज, पाणी पुरवठा आणि वाहनतळ सुविधा यांचा आर्थिक भार विजेत्यांवर टाकण्यात आला आहे. त्यामुळे घराची किंमत ४३ लाख ४५ हजार २३६ रुपयांवरून ५९ लाख ७४ हजार ८०० रुपयांवर पोहोचली आहे.

हेही वाचा >>> साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?

थेट ४० टक्क्यांनी किंमती वाढल्याने आणि भोगवटा प्रमाणपत्र कधी मिळणार हे माहिती नसताना देकार पत्र देत घराची रक्कम भरून घेतली जात असल्याने विजेते आणि लाभार्थी प्रचंड नाराज आहेत. त्यात म्हाडाने किंमती कमी करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही गाऱ्हाणे घेतले.  पण त्यांच्याकडूनही ठोस आश्वासन मिळालेले नाही. त्यामुळे तेथील लाभार्थ्यांनी आता थेट आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवार सकाळपासून आझाद मैदानावर आंदोलनास सुरुवात केली आहे.