मुंबई : चेंबूर येथे पुनर्विकास प्रकल्प राबवून ३६ स्थानिक रहिवाशांना घर देण्याचे आमिष दाखवून ३० कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली बांधकाम कंपनी मे. जी. ए. बिल्डर्स प्रा. लिमिटेडसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. तक्रारदार बाळकृष्ण चव्हाण यांच्या तक्रारीवरून चेंबूर पोलीस ठाण्यात मे. जी. ए. बिल्डर्स प्रा. लि, अनिल अगरवाल (मृत), सारंग अगरवाल, अनुभव अगरवाल, गोकुळ अगरवाल व इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : मुंबई : हत्या प्रकरणातील आरोपीला हैदराबाद येथून अटक

तक्रारीनुसार, चेंबूर सुभाष नगर म्हाडा कॉलनी इमारत क्रमांक २१ चा पुनर्विकास करण्याबाबत करार झाला होता. त्याअंतर्गत या इमारतीत ३६ रहिवाशांना पुनर्विकासात बांधण्यात येणाऱ्या इमारतीत सदनिका विनामूल्य मिळणार होती. तसेच दरमहा भाडे, कॉर्पस फंड, इतर सुविधा याबाबत आश्वासन दिले होते. ते पूर्ण केले नाही.