मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून १० मार्च २०२५ रोजी एकाच दिवशी १७१ रुग्णांना वैद्यकीय मदत करण्यात आली. या रुग्णांना तब्बल १ कोटी ४६ लाख २० हजार रुपयांची मदत वितरीत करण्यात आल्याची माहिती कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. यामध्ये मेंदूशी निगडीत आजाराचे सर्वाधिक ३५ आणि हिप रिप्लेसमेंटच्या २९ रुग्णांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील कोणत्याही गरजू रुग्णाला आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहू द्यायचे नाही, या उद्देशाने मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यरत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना तातडीने आणि अधिकाधिक मदत मिळावी यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत. या कक्षांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना विविध आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य केले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षाची व्यापकता वाढविण्यावर विशेष भर दिला जात आहे. त्यातूनच १० मार्च रोजी एकाच दिवशी राज्यातील १७१ रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून तब्बल १ कोटी ४६ लाख २० हजार रुपये मदत करण्यात आली.

या आजारावरील रुग्णांना मदत

मेंदूचा आजार असलेले सर्वाधिक ३५ रुग्ण आहेत. त्याखालोखल हिप रिप्लेसमेंटचे २९ रुग्ण, हृदयरोगाचे १८ रुग्ण, रस्ते अपघाताचे १७ रुग्ण, कर्करोग शस्त्रक्रियेचे १७ रुग्ण, अपघात शस्त्रक्रियेचे १२ रुग्ण, कर्करोग केमोथेरीपी किंवा रेडीएशनचे १० रुग्ण, बाल रुग्ण १०, नवजात बालरोग ७ रुग्ण, डायलिसिसचे ५ रुग्ण, गुडघा प्रत्यारोपण ५ रूग्ण, कर्करोगाचे २ रुग्ण, अस्थिमज्जा प्रत्यारोपण १ रुग्ण, मूत्रपिंड प्रत्यारोपण १ रुग्ण, यकृत प्रत्यारोपण १ रुग्ण, तर विशेष प्रकरणातील १ रूग्ण अशा एकूण १७१ रूग्णांना एकाच दिवशी कक्षाच्या माध्यमातून मदत करण्यात आली.

गरजू उपचारापासून वंचित राहू नयेत

राज्यातील कोणत्याही गरजू रुग्णाला आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहू द्यायचे नाही या उद्देशाने मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यरत आहे. भविष्यातही गरजू रुग्णांसाठी अधिक मदत आणि तत्पर सेवा पुरवण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष कटिबद्ध राहील असा विश्वास रामेश्वर नाईक यांनी व्यक्त केला.

कशी मिळवू शकता मदत

मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवण्यासाठी मुंबईतील मंत्रालयात येण्याची आवश्यकता नाही. सहायता कक्षाच्या मदत क्रमांक ८६५०५६७५६७ वर दूरध्वनी करून थेट मोबाइलवर अर्ज उपलब्ध करून दिला जात आहे. तसेच राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षास अर्जासह कागदपत्रे charityhelp.dcmo @maharashtra.gov.in या ई-मेल आयडीवर मेल करता येतात किंवा प्रत्यक्ष कक्षात आणून देता येतील, अशी माहिती रामेश्वर नाईक यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister relief fund cell helps 171 patients in a single day mumbai print news amy