मुंबई : नागरिकांना पावसाळ्यात पूरस्थितीची आगाऊ सूचना मिळावी आणि जीवित – वित्त हानी टळावी या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने ‘आयफ्लोज’ ही अत्याधुनिक प्रणाली नुकतीच कार्यान्वित केली असून, या यंत्रणेमुळे ६ ते ७२ तास अगोदर संभाव्य पूरप्रवण क्षेत्रांना सतर्कतेचा इशारा देणे शक्य होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई महानगरपालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग आणि राष्ट्रीय समुद्रीतट संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पूरप्रवण क्षेत्रात पूरस्थितीबाबत आगाऊ सूचना देणारी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. कोणत्या भागात पूर येऊ शकतो, पुराच्या पाण्याची उंची किती असेल याची माहिती या यंत्रणेद्वारे प्राप्त होणार आहे.

हेही वाचा – “ते भाजपा कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत, मी स्वतः…”, शिंदे गटाबरोबरच्या वादावर भाजपा नेत्याची मोठी प्रतिक्रिया

गेल्या दोन वर्षांपासून ही प्रणाली तयार करण्याचे काम सुरू होते. संशोधकांनी यासाठी मुंबईतील पर्जन्यमान, पाणी वाहून नेण्याची क्षमता, स्थलाकृतिक, जमिनीचा वापर, पायाभूत सुविधांचा विकास, लोकसंख्या, तलाव, खाड्या आणि नदी-नाल्यातील पाण्याची माहिती याबाबतचा अभ्यास केला. यामध्ये मिठी, दहिसर, ओशिवरा, पोईसर आणि उल्हास या नद्यांचा समावेश आहे.

प्रणालीचा प्राथमिक स्रोत पावसाचे प्रमाण आहे. या प्रणालीमार्फत शहरात उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीच्या मूल्यांकनासाठी समुद्राला येणारी दैनंदिन भरती, तसेच ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटांची भरती विचारात घेण्यात आली.

हेही वाचा – मुंबई : नेदरलॅण्डमधून टपालाद्वारे अंमलीपदार्थ मागवणारे दोघे अटकेत

कशी असेल ही यंत्रणा?

  • आयफ्लोज ही मान्सून कालावधीत हवामान अंदाज व पर्जन्यवृष्टीचे निरीक्षण करून संभाव्य पूर परिस्थितीची आगाऊ सूचना देणारी प्रणाली आहे.
  • ही प्रणाली ६ ते ७२ तास अगोदर संभाव्य पूरप्रवण क्षेत्रांना सतर्कतेचा इशारा देण्यास सक्षम आहे.
  • शहरातील पर्जन्य जलवाहिन्यांच्या जाळ्यांची क्षमता लक्षात घेऊन पूरस्थितीचा अंदाज वर्तविण्याची तरतूद या प्रणालीमध्ये आहे.
  • या प्रणालीमध्ये नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग, भारतीय हवामान विभाग, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, मुंबई महानगरपालिका आणि हवामान विभागाने स्थापित केलेल्या पर्जन्‍यमापक स्थानकांच्या जाळ्यामधील माहितीचा समावेश करण्यात आला आहे.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens will get advance warning of floods in monsoon mumbai mnc updated system is operational mumbai print news ssb